कनकशिळ ते रेल या डोंगराजवळून जाणाऱ्या रस्त्याचे काम सध्या घाईगडबडीत सुरू असून रस्त्यावर ठिसूळ तसेच एकदम पातळ खडी अंथरूण ठेकेदाराकडून काम अटोपते घेतले जात आहे. खडी दबाईसाठी आणलेले रोलर हे एका बाजूस उभे असूून विना\पाणी तसेच दबाई न करताच हे काम उरकले जात आहे. या रस्त्याच्या कामाकडे शाखा अभियंता, सहायक अभियंता फिरकत नसल्यामुळे या रस्त्याच्या कामाचा दर्जा घसरला आहे. इंदापूर ते झरी या रस्त्याच्या कामावर मातीयुक्त मुरुमाचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. शेखपुरवाडी ते शिरोडी या रस्त्याचे कामही अंदाजपत्रकानुसार केले जात नसल्यामुळे या कामाचा दर्जा खालावला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ही बाब नागरिकांनी पं.स.चे शाखा अभियंत्यांना वेळोवेळी सांगूनही त्यांनी याकडे कानाडोळा केला आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार केले नाहीतर, मनसे तालुकाध्यक्ष अविराज निकम यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
फोटो : कनकशीळ ते रेल रस्त्यावर अंथरलेली निकृष्ट खडी.
170321\20210307_180635_1.jpg
कनकशीळ ते रेल रस्त्यावर अंथरलेली निकृष्ठ खडी.