कायगाव : सोयाबीन पिकाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गळनिंब, अगरवडगाव आणि भिवधानोरा या तिन्ही गावांत उन्हाळी सोयाबीनचे यशस्वी उत्पादन घेण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदा परिसरातील जवळपास ५० एकर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झालेली आहे. आता काही उन्हाळी सोयाबीन पिकांची काढणी पूर्ण झाली असून, काही पिके काढणीसाठी तयार आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पीक तयार झाले असून, त्यांना एकरी ९ ते १० क्विंटल सरासरी उत्पादन मिळाले आहे. तसेच उर्वरित क्षेत्रांतसुद्धा एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. कृषी विभागाने गेल्या हंगामातच पुढील हंगामात लागणारे बियाणे स्वतः तयार करण्याचे केलेले नियोजन या शेतकऱ्यांनी प्रयत्नपूर्वक सफल केले आहे. उन्हाळी पिकांमुळे परिसरातील चालू खरीप हंगामातील सोयाबीन बियाण्याचा प्रश्न मिटणार आहे. हेच बियाणे शेतकऱ्यांना पुढील पेरणीसाठी वापरता येणार आहे.
चौकट
कृषी विभागाच्या पथकाची भेट
शुक्रवारी अगरवाडगाव येथील सोयाबीन उत्पादक शेतकरी पांडुरंग वाघ यांच्या सोयाबीनच्या क्षेत्राची तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी पाहणी केली. उन्हाळी सोयाबीन पीक पद्धतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तालुका कृषी अधिकारी तारगे यांच्या उपस्थितीत खरीप पूर्व नियोजनबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी विष्णू मोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी पर्यवेक्षक व्ही. ए. घोडके, कृषी सहायक मनीषा तागड, शेतकरी प्रवीण बोकडीया, पांडुरंग वाघ, पंढरी वाघ, बाळासाहेब वाघ, जगन्नाथ औटे, नानासाहेब म्हसरूप, रामेश्वर वाघ, अरुण खैरे, किशोर वाघ, निखिल गायकवाड, किशोर केरे, आदी शेतकरी हजर होते.
फोटो :
धनगरपट्टी शिवारात शुक्रवारी उन्हाळी सोयाबीन पिकांची पाहणी करताना.
070521\tarekh ahemad usuf shaikh_img-20210506-wa0033_1.jpg
धनगरपट्टी शिवारात शुक्रवारी उन्हाळी सोयाबीन पिकांची पाहणी करतांना.