सोमनाथ खताळ, बीड‘व्हॅलेंटाईन डे’ एका वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या नवीन पायंडा ‘माणुसकी’ गु्रपने शनिवारी पाडला. सामाजिक उत्तरदायित्त्वाचे भान ठेवून प्रेमाच्या दिवशी ५०० आजी माजी विद्यार्थ्यांनी ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली. या पायंड्याने समाजापुढे आदर्श तर ठेवलाच आहे, शिवाय रक्तदानाने सामाजिक कार्यात हातभार लावला.संस्थाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक बोल्डे, जिल्हा कारागृह अधीक्षक भास्कर औताडे, दीपक मुळे, प्राचार्य डॉ.नामदेव सानप, प्रा.गणेश पोकळे, प्रा. बापूसाहेब शिंदे, वैजीनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.‘जिथं कमी, तिथं आम्ही’ हे घोषवाक्य घेऊन बीडमधील वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालय व संभाजीराजे संगणकशास्त्र महाविद्यालयातील ५०० आजी माजी विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ चा मुहूर्त साधत ‘माणुसकी’ नावाचा ग्रुप तयार केला. याच दिवशी अनेक तरूण नशा करतात, आपल्या ‘प्रिय’ व्यक्तीला सोबतीला राहून हजारो रूपयांचा खर्च करतात. फुुल, महागडे गिफ्ट देऊन हा दिवस अनेकजन साजरा करतात. मात्र या खर्चाला फाटा देत या तरूणाईने हरवत चाललेली माणुसकी जोपासण्याचे काम केले आहे. यामुळेच या ग्रुपला ‘माणुसकी’ असे नाव दिल्याचे ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले.रोपे देऊन केला सत्कारयावेळी मान्यवरांनी माणुसकी ग्रुपचे कौतूक केले. आजी-माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन मनीषा सरकाळे हिने केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एखादा ग्रुप तयार करायचा म्हटलं की, त्यात पुढारपण कराणयला एक असतोच. मात्र या ग्रुपमध्ये असे काहीही नाही. या ग्रुपमध्ये ना अध्यक्ष आहे ना पदाधिकारी. सगळेच या ग्रुपमध्ये महत्त्वाचा घटक म्हणून काम करीत आहेत. या ग्रुपमध्ये सदस्यत्त्व मिळवताना राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवण्यात आले. केवळ सामाजिक भान जपण्यासाठी हे संघटन उभे केले आहे.
‘व्हॅलेंंटाईन’ला अशीही ‘माणुसकी’
By admin | Published: February 15, 2015 12:41 AM