औरंगाबाद : शिक्षणानिमित्ताने शहरात राहणाऱ्या केनियन तरुणाने सुदानी मैत्रिणीच्या घराचे दार तोडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना ५ एप्रिल रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास घडली. तरुणीने त्याचा प्रतिकार करताच त्याने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी आरोपीला अटक केली.रोशन मौलादी आॅनयेगा (२५, रा. कटकटगेट परिसर) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. याविषयी सिटीचौक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुदानी तरुणी शिक्षणानिमित्ताने गेल्या काही वर्षांपासून सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत आहे. तर आरोपी रोशन मौलादी हा कटकटगेट परिसरात राहतो. उभयतांमध्ये ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. दोघेही परस्परांच्या खोलीवर येऊ- जाऊ लागले. ५ एप्रिल रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास रोशन हा मैत्रिणीच्या खोलीवर गेला. त्यावेळी पीडिता तिच्या घरात गाढ झोपलेली होती. रोशन मौलादीने दार ठोठावले. तेव्हा एवढ्या रात्री तू येथे कशाला आला, असा सवाल दार न उघडताच पीडितेने त्याला केला. त्याचा राग आल्याने त्याने दार उघडण्यासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर दार तोडून रोशन मौलादी आत घुसला आणि त्याने पीडितेसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. त्यावेळी पीडितेने त्याचा प्रतिकार करताच आरोपीने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. यावेळी पीडितेच्या शेजारील लोक जमा होताच आरोपी तेथून पळून गेला. या घटनेप्रकरणी पीडितेने आरोपी मित्राच्या विरोधात गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
सुदानी मैत्रिणीच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 11:29 PM
शिक्षणानिमित्ताने शहरात राहणाऱ्या केनियन तरुणाने सुदानी मैत्रिणीच्या घराचे दार तोडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना ५ एप्रिल रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास घडली. तरुणीने त्याचा प्रतिकार करताच त्याने तिला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच सिटीचौक पोलिसांनी आरोपीला अटक केली.
ठळक मुद्देसिटीचौक ठाण्याच्या हद्दीतील घटना : केनियन विद्यार्थी अटकेत