औरंगाबाद : दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी आज रेल्वेस्टेशनवर पाहणी सुरू केली. त्यांच्या अचानक पाहणी दौर्याने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
रेल्वे व्यवस्थापकांनी रेल्वेस्टेशनवरील अस्वच्छता, रेल्वे रुळाची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली. मालधक्का परिसरात त्यांनी पाहणी केली. यावेळी धूळ उडू नये म्हणून मालट्रक थांबवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तब्बल दोन तासांपासून व्यवस्थापकांची प्रत्येक विभागात जाऊन पाहणी सुरु असल्याने येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ होत आहे.
पहा व्हिडीओ :