औरंगाबाद : केंद्र सरकारने साखरेच्या आयात शुल्कात वाढ केल्याने साखर पाच रुपयाने महागणार अशा बातम्या झळकल्या. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सट्टेबाज, साठेबाजांनी बाजारात गर्दी केली. औरंगाबादेत दिवसभरात हजार ते बाराशे क्ंिवटल साखरेचा खप होतो. तो मंगळवारी अडीच हजार क्ंिवटलवर गेल्याने साखर एक रूपयाने वधारली. मोदी सरकारने सोमवारी साखरेचे आयात शुल्क १५ टक्क्यांऐवजी ४० टक्के केले. यामुळे किलोमागे ४ ते ५ रुपयांनी साखर महाग होईल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे आधीच साखरेचा साठा करून ठेवण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी मंगळवारी दिवसभर मोंढ्यात गर्दी केली. एक विक्रेता एक किंवा दोन पोती साखर खरेदी करीत होता, तेथे त्याने चार ते पाच पोती साखर खरेदी केली. अचानक मागणी वाढल्याने साखर क्विंटलमागे १०० रुपयांनी अर्थात प्रतिकिलोमागे १ रुपयांनी महागली. यासंदर्भात कमिशन एजंट राजेश कासलीवाल यांनी सांगितले की, देशातच साखरेचे उत्पादन अधिक असल्याने साखरेची आयात कमी प्रमाणात होते. यामुळे साखरेवर आयात शुल्क वाढविल्याने साखरेच्या भावात फरक पडला नाही; पण साखरेचे भाव कडाडतील, या बातम्यांमुळे मार्केटमधील सट्टेबाज सक्रिय झाले. कारखान्यांमधील साखर उचलून ५० रुपये जास्त भावात विक्री करणे सुरू केले. यामुळे बाजारात तेजी आली. साठेबाज पुन्हा सक्रियठोक विक्रेता अनिल सेठी म्हणाले की, पावसाने दडी मारल्याने साखरेला अपेक्षित मागणी नव्हती. शहरात दररोज हजार ते दीड हजार क्विंटल साखर विक्री होते. मात्र, किरकोळ व्यापाऱ्यांनी मोंढ्यात साखर खरेदीसाठी गर्दी केली. जालन्यातील ठोक व्यापारी संजय लोहाडे यांनी सांगितले की, नवीन केंद्र शासन साठेबाजांविरोधात कडक कारवाई करील, या भीतीने साठेबाजांनी साखरेचा साठा कमी केला होता; पण भाववाढीच्या बातम्यांमुळे ते पुन्हा सक्रिय झाले. भाव किती? (प्रतिक्विंटल)४साखर एस.(बारीक)- ३१०० रुपये४सुपर एस. (मध्यम )- ३२०० रुपये४साखर एम. (जाड) - ३३०० रुपये
साखर महागली; पण एक रुपयाने !
By admin | Published: June 25, 2014 1:24 AM