शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

उसाच्या तुटवड्याने यंदा गाळप हंगाम दोन महिन्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 4:12 PM

मराठवाड्यातील १९ कारखान्यांची साखर उत्पादनाची तयारी

ठळक मुद्दे उसाची उपलब्धता कमी असल्याने जानेवारीअखेरपर्यंतच कारखाने सुरू राहतील.  यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ५ कारखाने बंद राहणार आहेत.

- प्रशांत तेलवाडकर  

औरंगाबाद : सुरुवातीच्या काळात पावसाने मारलेली दडी व परतीच्या पावसाने दिलेला फटका यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत महिनाभर उशिराने गाळप हंगाम सुरू होणार आहे. औरंगाबाद विभागात २४ पैकी, १९ साखर कारखान्यांची ऊस गाळपासाठी आॅनलाईन परवानगी मागितली असून, त्यातही आजपर्यंत ९ कारखान्यांना मंजुरी देण्यात आली आहे. २५ तारखेनंतर बॉयलर पेटतील; पण उसाची उपलब्धता कमी असल्याने जानेवारीअखेरपर्यंतच कारखाने सुरू राहतील. 

औरंगाबाद विभागात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांचा समावेश होतो. मागील हंगामात मार्च २०१९ पर्यंत या विभागातील २४ साखर कारखान्यांनी मिळून ८८ लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचा गाळप केला होता. त्यात ९३ लाख क्विंटल साखर तयार झाली. १०.४८ टक्के उतारा मिळाला. मागील वर्षी २४ आॅक्टोबरपासून साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले होते. कृषी विभागाच्या मते, मराठवाड्यात १ लाख हेक्टरवर ऊस लावण्यात आला होता. यात पैठण, गंगापूर, अंबड, घनसावंगी, माजलगाव, गेवराई या भागांतच ऊस होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पर्जन्यमानामुळे अनेक भागांतील ऊस वाळला, जळाला. ज्या ठिकाणी पाणी होते तिथे शेतकऱ्यांनी ऊस जगविला. मात्र, परतीच्या पावसाने फटका दिल्याने ऊस आडवा पडला. यामुळे किती ऊस उपलब्धता आहे याबाबत अजून पूर्ण आकडेवारी प्राप्त झाली नाही. 

या परिस्थितीमुळे यंदा २४ पैकी अवघ्या १९ साखर कारखान्यांनीच गाळपाची परवानगी साखर आयुक्तांकडे मागितली आहे. त्यातील ९ कारखान्यांनाच गाळपाची मंजुरी देण्यात आली. दरवर्षी साखर आयुक्त मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवत असतात. त्यात साखरेचा दर व हंगामाला मंजुरी दिली जात असते. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवटी सुरू आहे. पुण्यातील साखर आयुक्तांनी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविला त्यात २५ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी मिळावी, असे म्हटले आहे. तोपर्यंत सरकार स्थापन झाले नाही, तर त्या खात्याचे सचिव याचा निर्णय घेतील. पाच कारखाने गाळप हंगाम करणार नाहीत, तसेच उसाचा ५० टक्के तुटवडा जाणवत आहे. यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ५ कारखाने बंद राहणार आहेत. परिणामी, साखर उत्पादनही निम्म्याने कमी होऊन ४० ते ४६ लाख क्विंटलपर्यंत होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

विभागात गत तीन वर्षांचे  गाळप, साखर उत्पादन, उताराची आकडेवारी  वर्ष                  कारखाने          ऊस गाळप                   साखर उत्पादन                            उतारा २०१४-२०१५         २२             ७४.३० लाख मे. टन           ७५.४४ लाख क्विंटल               १०.१५ टक्के२०१५-२०१६        २२               ५१.२७ लाख मे. टन          ५०.७९ लाख क्विंटल                 ९.१९ टक्के२०१६-२०१७        १७              २१.८२ लाख मे. टन           १९.६१ लाख क्विंटल                 ८.९९ टक्के२०१७-२०१८        २३               ८५ लाख मे. टन               ८४.८३ लाख क्विंटल                 ९.९७ टक्के२०१८-२०१९       २४                ८८.७३ लाख मे. टन          ९३ लाख क्विंटल                     १०.४८ टक्के 

या कारखान्यांना मिळाली गाळपाची मंजुरी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर सहकारी साखर कारखाना, मुक्तेश्वर शुगर मिल, अयान मल्टीट्रेड (नंदुरबार), बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड, छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग, संत मुक्ताई शुगर लिमिटेड, श्रद्धा एनर्जी, संत एकनाथ साखर कारखाना, एनएसएल शुगर लिमिटेड, यांचा समावेश आहे. येत्या आठवडाभरात आणखी ९ कारखान्यांना गाळपाची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागाकडून मिळाली.  

उसाला अतिवृष्टीचा फटका मागील हंगामात मराठवाड्यात सुमारे १ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. गोदाकाठच्या भागात ऊस लागवड होत असते. सुरुवातीला पाणी नसल्याने ऊस जळाले व नंतर परतीचा अतिवृष्टीने उसाला फटका बसला. यामुळे यंदा उसाचे क्षेत्रात कमालीची घट झाली; पण मुबलक पाण्यामुळे पुढील हंगामात दोन ते अडीच लाख हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र वाढेल.  -एस.के. दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी