लोकमत न्यूज नेटवर्कऔैरंगाबाद : साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर काही भागात कापूस पिकाचे क्षेत्र उसाच्या क्षेत्रात परावर्तीत झाले आहे. मागील २०१६-२०१७ या गाळप हंगामाचा विचार केला, तर जिल्ह्यात २१३२५.३० हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यात औरंगाबाद तालुक्यात ४४२ हेक्टर, पैठण ७७८७ हेक्टर, फुलंब्री ४५९.३ हेक्टर, गंगापूर ७५१८.२ हेक्टर, वैजापूर २०२२.५ हेक्टर, खुलताबाद ११००.८ हेक्टर, सिल्लोड ५११.३ हेक्टर, कन्नड १४८४.३ हेक्टरचा समावेश होता. मात्र, या वर्षाच्या उत्तरार्धात सुरूहोणाºया गाळप हंगामासाठी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यांतर्गत २६२८ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. संत एकनाथ कारखान्यांतर्गत ४५९० हेक्टर, छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्यांतर्गत ४५२५ हेक्टर, मुक्तेश्वर कारखान्यांतर्गत ५३४४ हेक्टर, बारामती अॅग्रो या कन्नड येथील साखर कारखान्यांतर्गत ६८०९ तर शरद साखर कारखान्यांतर्गत २३४१ हेक्टर असे एकूण २६३३७ हेक्टरवर लागवड झाली. कृषी विभागानुसार यंदा पाऊस समाधानकारक राहिला, तर १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात सरासरी कपाशीचे क्षेत्र ४ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, खरीप हंगामात ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरच कपाशीची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मागील हंगामाच्या तुलनेत ६० हजार हेक्टरने कपाशी क्षेत्र कमी होईल. उसाचे क्षेत्र ५०११.७० हेक्टरने वाढणार आहे. अन्य ५५ हजार हेक्टर पीक मका, बाजरी व अन्य कडधान्याच्या क्षेत्रात परावर्तीत होणार आहे.१४ लाख २३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादनजिल्ह्यात एक सहकारी व चार खाजगी अशा ५ साखर कारखान्यांनी मिळून मागील हंगामात १४ लाख ३५ हजार ३२७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांनी १४ लाख ४३ हजार ३२२ मे.टन उसाचे गाळप केले.या पासून ९.९५ टक्के उतारा मिळाला. मात्र, कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदा जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढणार असून, १७ लाख ९९ हजार मेट्रिक टन उसाचे उत्पादन होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत येत्या हंगामात ३ लाख ५५ हजार ७७३.४९ मे.टनने ऊस उत्पादन वाढेल. यामुळे साखरेच्या उत्पादनातही वाढ होणार असल्याची माहिती कृषी अधिकाºयांनी दिली.
औैरंगाबाद जिल्ह्यात ५ हजार हेक्टरने वाढले उसाचे क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 1:04 AM
साखरेचे भाव बाजारपेठेत गडगडले असतानाही यंदा जिल्ह्यात ५०११.७० हेक्टरने उसाचे क्षेत्र वाढले आहे. मागील वर्षी बोंडअळीच्या उद्रेकामुळे कपाशीऐवजी ऊस लागवडीला शेतकºयांनी प्राधान्य दिले आहे.
ठळक मुद्देबदलती पीक परिस्थिती : कपाशीऐवजी उसाकडे शेतकऱ्यांचा कल; १७ लाख मे.टन उसाचे होणार उत्पादन