तारेख शेख ।लोकमत न्यूज नेटवर्ककायगाव : यावर्षी जवळपास सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे ऊस उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे यंदा कायगावातील उसाची मागणी घटली आहे. दरवर्षी कायगाव परिसरात ऊस खरेदीसाठी राज्यभरातील कारखानदारांमध्ये चढाओढ दिसून येत होती. मात्र, यावर्षी येथील बळीराजावर ‘ऊस घ्या हो ऊस!’ असे कारखानदारांना म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, कारखानदार प्रतिसाद देत नसल्याने शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे.गोदावरी नदीकाठी असलेले कायगाव, जुने कायगाव, लखमापूर, अंमळनेर, गणेशवाडी, पखोरा, भेंडाळा, धनगरपट्टी, अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब आदी भागांत सुमारे साडेचार ते पाच हजार हेक्टर ऊस दरवर्षी उपलब्ध असतो. यंदाही चांगला पाऊस पडल्याने या भागात सुमारे तीन लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होता. मागच्या वर्षी याच ३ लाख मेट्रिक टन उसावर अनेक साखर कारखान्यांनी आपले गळीत हंगाम कडेस नेले होते.गतवर्षी सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि उसाच्या कमतरतेच्या गेल्या हंगामात अनेक साखर कारखान्यांनी कायगाव भागातील ऊस उत्पादक शेतकºयांची मनधरणी केली होती. मात्र, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाल्यामुळे चित्र पालटले आहे. कायगाव परिसरातील शेतकºयांवरच कारखानदारांची उसासाठी मनधरणी करण्याची वेळ आली आहे.कायगाव परिसरात उसाच्या हंगामाच्या सुरुवातीला एकट्या अहमदनगर जिल्ह्यातील किमान १५ आणि इतर जिल्ह्यांतील ५ ते ६, अशा २० हून अधिक खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी कार्यालये सुरू केली होती. मात्र, जसजसा हंगाम पुढे गेला तसतसे कारखान्यांनी या भागवरचे लक्ष कमी केले. पुढे परिस्थिती एवढी बिकट झाली, की ऊस उत्पादक शेतकºयांना आपला ऊस कारखान्याला देण्यासाठी कारखान्याच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागले. काही भागात तर ऊस उत्पादक शेतकºयांना स्वत:च मजुरांची व्यवस्था करून ऊस तोडून कारखान्यात नेऊन टाकावा लागला आहे. आजही या भागात तोडणीअभावी शेतात ऊस उभा आहेउसाच्या मोबदल्यासाठी फरपटहंगामाच्या सुरुवातीला शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी साखर कारखानदारांशी उसाच्या दरासंदर्भात मोठा संघर्ष केला. मात्र, तरीही शेतकºयांच्या पदरात फारसे काही पडले नाही. अगोदर जाहीर केल्याप्रमाणे काही साखर कारखान्यांनी एका मस्टरचे पेमेंट काढले. मात्र, यावर्षी साखरेचा भाव हंगाम सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उतरला.४त्यामुळे साखर कारखानदारांनी पेमेंट देण्यात हात आखडला आहे. सुरुवातीला काही जणांनी २,३०० रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे पेमेंट दिले. मात्र, नंतरचे पेमेंट २,००० रुपयांप्रमाणे काढण्यात आले. त्यातही बहुतांश साखर कारखान्यांनी १५ डिसेंबरनंतरचे उसाचे बिल थकविल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
कारखानदारांनो, आमचा ऊस घ्या हो ऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:23 AM