शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

सात महिन्यांच्या गर्भवती प्राध्यापिकेची आत्महत्या, १० वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

By योगेश पायघन | Published: February 04, 2023 1:16 PM

सासरच्या जाचाला कंटाळून गळफास; नातेवाईकांचा आरोप

औरंगाबाद : गारखेडा परीसरातील ३० वर्षीय उच्च शिक्षित अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापिकेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. वर्षा दीपक नागलोत (३० रा. प्लाॅट नं ७८-७८, गजानन काॅलनी, कन्या शाळेच्या बाजुला गारखेडा परीसर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. त्या सात महिन्यांच्या गरोदर होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहिनीनुसार, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असतांना २०१२ मध्ये वर्षा यांची नातेवाईक असलेल्या दीपक नागलोत यांच्याशी ओळख झाली. त्यातून प्रेम जुळल्यावर त्यांनी प्रेमविवाह केला. दीपक खाजगी कंत्राटदार असून या दांपत्याला ८ वर्षांचा मुलगा दुसरीत शिकत आहे. तर वर्षा सात महिन्यांच्या गरोदर होत्या. ईलेक्ट्राॅनिक्स ॲण्ड टेलि कम्युनिकेशनमध्ये एमई करून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत वर्षा शुक्रवारी एमआयटी महाविद्यालयातून ड्युटीवरून परतल्या. त्यानंतर बेडरूमध्ये पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे सायंकाळी ६.२० वाजता समोर आले. त्यांना पती दीपकसह सासरकडील मंडळींनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मयत घोषीत केले. त्यावेळी आणलेली कार अपघात विभागासमोर सोडून ते निघून गेले. असे नातेवाईकांनी सांगितले. ही कार शनिवारी सकाळपर्यंत घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोर उभी होती.

सासरच्या जाचाला कंटाळून गळफास; नातेवाईकांचा आरोप१० वर्षांपुर्वी प्रेमविवाह केलेल्या वर्षा यांना गेल्या वर्षांपासून सासरचा जाच होता. मात्र, प्रेमविवाह असल्याने त्या माहेरी काही सांगत नव्हत्या. गुरूवारी काही तरी वाद घरात झाला होता. त्यावेळी वर्षा यांच्या सासुने वडील शांतिलाल जारवाल (रा. सजरपुरवाडी, ता. वैजापुर) यांना फोन करून वर्षाने काही सांगितले का अशी विचारणा केली होती. सासरच्या जाचाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचा आरोप मयत वर्षा यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप काळे, करित आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद