लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तरचे शिक्षण घेत असताना जुळलेले प्रेम एका विद्यार्थ्याच्या जिवावर बेतले. मंगळवारी पे्रयसीसोबत मोबाइलवरून संवाद साधत असतानाच वसतिगृह क्रमांक एकमधील ७६ नंबर खोलीत पंख्याला त्याने गळफास घेतला. तत्पूर्वी ‘तू बॅग भरून लगेच औरंगाबादला ये, आपण पळून जाऊन लग्न करू, नाही तर मी आत्महत्या करतो,’ असे तो तिला बजावत होता. त्या तरुणाने प्रेम प्रकरणातूनच आत्महत्या केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.पळून जाऊन लग्नासाठी हट्टविद्यापीठातील एका विद्यार्थिनीसोबत अमोलचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी दिली. तो सतत फोनवर बोलत असायचा; मात्र मित्रांमध्ये सर्वांना सोबत घेऊन चालणारा असल्यामुळे सर्वांचा लाडका होता. मंगळवारीही तो पे्रयसीसोबत फोनवर बोलत होता. ती गावाकडे गेलेली असल्यामुळे तिला सर्व सामान घेऊन ये, आपण पळून जाऊन लग्न करू, असा हट्ट करीत होता; मात्र पे्रयसी घरच्यांची परवानगी घेऊन लग्न करू असे म्हणत होती. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, तिच्या जवळच्या मैत्रिणींनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.प्रेयसीचा सतत त्याच्या मोबाइलवर फोनअमोलच्या मोबाइलवर प्रेयसीचा सतत फोन येत होता. त्याने आत्महत्या केली, त्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांनी तिचा फोन उचलून तिच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला; मात्र तिने रडणे सुरू केल्यामुळे आईकडे फोन देण्यास सांगितले. तेव्हा आईला बोलताना कोळेकर यांनी तिच्याकडे लक्ष ठेवा, एकटे सोडू नका, अशा सूचना दिल्या.
विद्यापीठाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:06 AM