भगवान भागवत यांच्याकडे खंडाळा शिवारात ४ एकर शेतजमीन आहे. त्या जमिनीवर खंडाळा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडून ४७ हजार रुपये व बचत गटाचे १० हजार रुपये असे एकूण ५७ हजार रुपये कर्ज त्यांनी घेतलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेेच्या यादीत नाव न आल्याने ते नैराश्यात गेले होते. शेतात नापिकी झाल्याने कर्ज कसे फेडावे, असा त्यांच्यासमोर प्रश्न होता. या तणावातूनच त्यांनी शनिवारी दुपारी शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ही बाब त्यांच्या कुटुंबीयांना कळविली. अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांच्या मृतदेहाचे अजिंठा येथे विच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा परिवार आहे. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोहेकॉ. गजानन चव्हाण हे करीत आहेत.
फोटो :