लासूर स्टेशन येथील दीपक खेत्रे हे हमालीचे काम करून कुटुंबाचा गाडा हाकतात. त्यांना तीन मुली आहेत. मोठी मुलगी प्रिया हिने प्रेमविवाह केला होता. मात्र, पतीला सोडचिठ्ठी देत ती आई-वडिलांकडे राहात होती. दीपक खेत्रे कुटुंबासह औरंगाबाद येथे अनेक दिवसांपासून राहतात. प्रिया औरंगाबाद येथून लासूर स्टेशन येथे न सांगता आली होती. दीपक खेत्रे यांनी औरंगाबाद येथील क्रांती चौक पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविली होती. तीन दिवसांनंतर लासूर स्टेशन येथील घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. शिल्लेगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर, बीट अंमलदार सविता वरपे, कैलास राठोड, दादाराव तिडके, अनिल दाभाडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर प्रियाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
घटनास्थळी सुसाईड नोट सापडली
प्रिया हिचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, पतीला सोडचिठ्ठी देत ती आई-वडिलांकडे राहात होती. तणावातच तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट सापडली असून, त्यात ‘पप्पा-मम्मी मला माफ करा, मी तुम्हाला दिलेले वचन निभावू शकले नाही,’ असा उल्लेख आहे.
फोटो :
010721\1932-img-20210701-wa0050.jpg
प्रिया खेत्रे