वाळूज महानगर : दोन वेगवेगळ्या घटनांत दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना वाळूज महानगरात रविवारी घडल्या. गणेश सोनवणे (२४, रा. रांजणगाव) व राजेंद्र निकम (३७, रा. विटावा फाटा), अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
रांजणगावातील गांधीनगरात गणेश सोनवणे याने घरात पत्र्याच्या लोखंडी पाईपच्या हुकाला ओढणीने गळफास घेतला. नातेवाईकांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत विटावा फाटा येथे राजेंद्र निकम याने घरातील छताच्या हुकाला रुमालाने गळफास घेतला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, दोघांच्याही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या दोन्ही घटनांची वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.