बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात सातत्याने निर्माण होणाºया टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा जिल्ह्याला चांगला फायदा झाला आहे. दोन वर्षांत ३६१ गावांत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे साचलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील एक लाख, ८७ हजार २७८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तर विहिरींच्या पाणीपातळीत चार मीटरने वाढ झाली आहे.जलयुक्त शिवार अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. २०१५-१६ मध्ये अभियानाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१२ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमध्ये सिमेंट नाला बांधाची ४४२, नाला खोलीकरणाची ५९६ कामे पूर्ण करण्यात आली. तर तीस हजार ४७६ हेक्टरवर बांधबंदिस्तीची कामे करण्यात आली.निवडलेल्या गावांतील कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात आली असून, या कामांवर आतापर्यंत वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून १०४ कोटी ८९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पहिल्या वर्षी झालेल्या या कामांना पावसाची चांगली साथ मिळाली. परिणामी विविध जलस्रोतांमध्ये ४९५५० टीसीएम एवढा जलसाठा झाला आहे.या पाण्याचा दोन संरक्षित सिंचनासाठी वापर केल्यास एक लाख ३४ हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. अभियानाच्या दुसºया टप्प्यात निवडलेल्या १८६ गावांमध्ये आतापर्यंत चार हजार ६८० कामांपैकी तीन हजार २९७ कामे पूर्ण करण्यात आली असून, यावर ८० कोटी ४६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.यामध्ये सिमेंट नाला बांधाची १७३, तर नाला खोलीकरणाच्या ३३३ कामांचा समावेश आहे. तब्बल दहा हजार ९८२ हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंगची कामे करण्यात आली आहे.पावसाचे पाणी शेतातच साचण्यास या कामांचा मोठा उपयोग झाला आहे. दुसºया टप्प्यातील कामांमध्ये ४३ हजार ६२२ इतका पाणीसाठा झाला आहे.पिकांना दोन संरक्षित सिंचन दिल्यास यामुळे ८७ हजार २४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
सुजलाम् सुफलाम्...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 12:48 AM