लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाळी सुटी व दाट लग्न तिथीमुळे जालना बसस्थानक तसेच रेल्वेस्थानकात प्रवासी भारमान दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. विदर्भ तसेच पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळी सुटीनिमित्त अनेक कुटुंबे गावी जातात. सोबतच लग्नतिथी दाट असल्याने जालना बसस्थानकात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे गर्दीने फुलून गेले आहे. प्रवासी भारमान वाढले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी संख्या वाढली आहे. प्रवासी भारमान ६८ ते ७० वर गेले आहे. जालना बसस्थानकातून दिवसभरात सरासरी ८० बसेसे धावतात. सुमारे ३० ते ३५ हजार किमीचे अंतर दररोज कपले जात आहे. विशेषत: विदर्भाकडे जाणारी प्रवासी संख्या जास्त आहे. त्यामुळे या भागात चार बसेस जादा सोडण्यात येत आहे. सोबतच औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेराजा, बीड येथे शटल बस आहे. सोलापूर, पुणेसाठीही बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. जालना मध्यवर्ती बसस्थानक असल्याने प्रवासी भारमान वाढले आहे. जालना आगारप्रमुख एस.जी.मेहेत्रे म्हणाले, औरंगाबाद, सिल्लोड, सिंदखेडा राजा, बीड, बुलडाणा, सोलापूर विदर्भासाठी बसेसच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रवाशांची गर्दी पाहता बसेस सोबतच फेऱ्याही वाढविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लग्नासाठी आगाऊ बसेसची मागणी करण्यात आली आहे. या हंगामात वीस पेक्षा अधिक बसेसची नोंदणी होण्याचा विश्वास महामंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
उन्हाळी सुटीनिमित्त बसस्थानक, रेल्वेस्थानकात गर्दी
By admin | Published: May 08, 2017 11:41 PM