शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

रविवार ‘खरीदी के नाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:01 AM

दिवाळीआधीचा रविवार शहरवासीयांनी ‘खरीदी के नाम’ केला. परिवारातील लहानथोरांना कपडे घेण्यापासून ते आकाश कंदिल, लक्ष्मीच्या छायाचित्राची वही, पूजेचे सामान अशी खरेदी जोमात केली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दिवाळीआधीचा रविवार शहरवासीयांनी ‘खरीदी के नाम’ केला. परिवारातील लहानथोरांना कपडे घेण्यापासून ते आकाश कंदिल, लक्ष्मीच्या छायाचित्राची वही, पूजेचे सामान अशी खरेदी जोमात केली. दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पुन्हा एकदा ग्राहकी पांगते काय, असे व्यापाºयांना वाटत होते; पण दिवसा पाऊस पडला नाही. यामुळे दिलासा मिळाला.सुटीचा दिवस असल्याने सकाळपासून बाजारात ग्राहकांनी गर्दी केली होती. जुन्या पारंपरिक बाजारपेठेप्रमाणेच सिडको-हडको, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, उल्कानगरी, काल्डा कॉर्नर परिसर, उस्मानपुरा, जालना रोड, बीड बायपास रोड या भागातील दुकानांमध्येही गर्दी पाहण्यास मिळाली. शहरातील तिन्ही मॉलमध्येही गर्दीचा उत्साह औरच होता. शहरवासीयांनी रेडिमेड कपडे खरेदीवर आज भर दिला. लहान मुलांचे कपडे पहिले खरेदी केले जात होते. शहरात काही दुकाने अशी आहेत की, तिथे दोन ते तीन दिवसांचे वेटिंग सुरू होते. पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछलीखडक तसेच औरंगपुरा, निरालाबाजार, शहागंज या परिसरातील कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकी उसळली होती. साजन सरिता एन.एक्स.चे इंदरचंद परसवाणी यांनी सांगितले की, पद्मावती पॅटर्न साडीची सध्या क्रेझ आहे. याशिवाय ढोला सिल्क, ड्रेस मटेरियलला मागणी आहे. दुल्हा-दुल्हनचे पंकेश अग्रवाल म्हणाले की, बुटिक डिझाइनर साड्या, मारवाडी कन्सेप्ट साड्या तसेच इर्म्पोटेड फॅब्रीक साड्या व पैठणी प्युअर सिल्कला अधिक मागणी आहे. शिवाजीनगर येथील सरोदे एजन्सीचे दीपक सरोदे यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्येही सध्या एलईडी टीव्ही खरेदीला पहिली पसंदी दिली जात आहे. एलसीडीचे ग्राहक आता एलईडी टीव्हीकडे वळत आहेत. तसेच विविध बक्षीस योजनांमुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारात खरेदीचा आनंद द्विगुणित होत आहे.