शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
2
High Court: 'यांना उपचाराची गरज'; मोदी-शाह यांना बडतर्फ करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काय म्हणाले न्यायाधीश?
3
नार्वेकरांमुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा पराभव होणार? शिंदे गटाचा मोठा दावा, असे आहे गणित...
4
PHOTOS : आई, प्रसिद्ध प्रेजेंटेटर अन् सेलिब्रेटी! बुमराहच्या पत्नीने दाखवले 'छोटेसे जीवन'
5
संस्कार आपापले! मोदी आणि राहुल गांधींच्या संसदेतील वर्तनाची तुलना करत भाजपाने लगावला टोला
6
“राज्यातील भ्रष्ट महायुतीला हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा”: रमेश चेन्नीथला
7
Jasprit Bumrah wife Sanjana Ganesan: सगळं सुंदर स्वप्नाप्रमाणे सुरु असताना जसप्रीत बुमराहची पत्नी संजनासोबत घडला विचित्र प्रकार
8
काय करायचे ते करा म्हणणाऱ्या अंबादास दानवेंनी दिलगिरीचे पत्र दिले; म्हणाले, सभागृहातही तयारी....
9
शरद पवारांनी दिली मोठी जबाबदारी; खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “...त्यामुळेच हे शक्य झाले”
10
“बालबुद्धीच्या नेत्याने PM मोदींना घाम फोडला, भाजपाला बहुमत गमवावे लागले”: संजय राऊत
11
हार्दिक ऑन टॉप! 'चॅम्पियन' पांड्याला ICC ने दिली खुशखबर; वर्ल्ड कपमधील कामगिरीचे बक्षीस
12
Hathras Stampede : योगी आदित्यनाथांनी दिला हाथरस चेंगराचेंगरीचा ग्राउंड रिपोर्ट!
13
हेमंत सोरेन यांना 6 महिन्यांनंतर जामीन; पुन्हा झारखंडच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार...
14
सालाबादप्रमाणे यंदाही वारकऱ्यांना आजपासून टोलमाफ; कसा मिळवणार? कधीपर्यंत...
15
सेन्सेक्स पोहोचला ८० हजारांपार, लार्जकॅप खासगी बँका चमकल्या; टाटा कन्झ्युमर टॉप गेनर, टीसीएस घसरला
16
Mobile Security:'पासवर्ड सेव्ह करण्याची पद्धतच चुकीची आणि मग म्हणता डेटा चोरीला गेला!'-पीटीआय वृत्तसंस्था
17
लग्नाला विरोध केल्याने डॉक्टर प्रेयसीने त्याचे गुप्तांग कापले; तिने रडत रडत पोलिसांना फोन केला पण...
18
मणिपूरमधील परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत दिली महत्त्वाची माहिती, काँग्रेसलाही सुनावले
19
'घोटाळा करणारे AAP चे, तक्रार करणारे काँग्रेसचे अन् शिव्या मोदीला', पंतप्रधानांचा हल्लाबोल
20
Team India Return From Barbados: एअरपोर्टवर लँडिंग, मोदींशी भेट अन् मुंबईत 'जल्लोष', मायदेशी 'असं' होणार टीम इंडियाचं स्वागत

शेतकऱ्यांची बाजू घेतली म्हणून केंद्रेकरांना व्हीआरएस घेण्यास भाग पाडले; अंबादास दानवेंचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 5:07 PM

'शेतकऱ्यांची बाजू मांडली म्हणून केंद्रेकरांना बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले'

छत्रपती संभाजीनगर: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी प्रशासकीय सेवेची अडीच वर्षे बाकी असताना अचानक ‘व्हीआरएस’ घेतल्याने प्रशासकीय अधिकारी आणि जनसामान्य आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्यांचे व्हिआरएस घेण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरून राज्य सरकारवर निशाना साधला आहे. शेतकऱ्यांची बाजू मांडली म्हणून केंद्रेकरांना  बळजबरीने स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.

स्वेच्छानिवृत्तीसाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेला विनंती अर्ज २७ जून रोजी शासनाने मंजूर केला आहे. या प्रकरणी आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केंद्रेकरांवर स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी राज्य सरकारमधील काहींनी दबाव टाकण्यात आल्याचा दावा केला आहे. केंद्रेकर मराठवाड्याच्या मातीशी जुळलेले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी एक सर्व्हे केला होता. तसेच यातून मिळालेल्या माहितीवरून केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांना हंगाम पूर्वी १० हजाराची मदत द्यावी यासह सरकारला काही सूचना केल्या होत्या. पण त्याचा सरकारमधील काही मंडळीना त्रास झाला. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. केंद्रेकर स्वाभिमानी अधिकारी आहेत. त्यांनी दबावाला बळी न पडता आपला राजीनामा सरकारच्या तोंडावर फेकून मारला, ही स्वेच्छानिवृत्ती नाही. त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले, असा आरोप दानवे यांनी केला.

३ जुलै रोजी सेवेतून मुक्त होणारधडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जाणारे केंद्रेकर हे फेब्रुवारी २०१९ पासून औरंगाबादचे विभागीय आयुक्त आहेत. तत्पूर्वी त्यांनी विक्रीकर विभागात सहआयुक्त, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, महापालिका आयुक्त आणि पुणे येथे राज्याचे कृषी आयुक्त म्हणून काम केले. २४ आणि २६ मे रोजी त्यांनी शासनास अर्ज करून स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. त्यांचा अर्ज शासनाने मंजूर केल्याचे पत्र अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी केंद्रेकर यांना पाठविले. ३ जुलै रोजी ते शासनाच्या सेवेतून मुक्त होतील.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयState Governmentराज्य सरकार