औरंगाबाद : कुटुंबामध्ये आईचे स्थान महत्त्वाचे आणि जबाबदारीचे असते. आई आपल्या मुलांच्या अतिशय जवळ असते. भावनिक नात्याने ती मुलांशी अधिकच जोडलेली असते. नेमके हेच नाते उलगडणारा एक कार्यक्रम लोकमत सखी मंच आणि झी टीव्ही घेऊन आला आहे. ‘सुपर मॉम, स्मार्ट किड्स’ हा कार्यक्रम मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजी लोकमत हॉल, लोकमत भवन येथे सायं. ५ वा होणार आहे. आई आणि मुलांच्या नात्यातील विविध पैलू या स्पर्धेच्या निमित्ताने रसिकांना बघायला मिळतील. ही स्पर्धा चार फेऱ्यांमध्ये होणार आहे. पहिली स्वपरिचय फेरी असेल. यात आईने मुलाचा आणि मुलाने आईचा परिचय करून द्यायचा आहे. दुसरी फेरी आहे कलाविष्कार फेरी. यात दोघांनी मिळून नृत्य, अभिनय, मिमिक्री, गायन, वादन अथवा कुठलीही कला सादर करायची आहे. तिसरी फेरी म्हणजे ‘दिल तो बच्चा है जी.. ’. तर शेवटची परीक्षक फेरी असणार आहे. यात परीक्षकांकडून प्रश्न विचारण्यात येतील. अशा प्रकारे आई आणि मुला-मुलींचा कलाविष्कार एकत्रितपणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कार्यक्रम बघायला आलेल्या मुलांसाठी स्केचिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यासाठी पेन्सिल, खोड रबर व एक्झाम पॅड घरून आणायचे आहेत. ड्रॉर्इंग शीट आयोजकांतर्फे देण्यात येतील. सखी मंच सदस्या तसेच कॅम्पस क्लब सदस्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. प्रेक्षकांसाठी भरपूर स्पर्धा फॅन्सी ड्रेस, बेस्ट ड्रेस, प्रश्नोत्तरे४आॅन दी स्पॉट बक्षिसे४विजेत्यांना आकर्षक पुरस्कार४याव्यतिरिक्त बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट जोडी, बेस्ट टॅलेंट व इतर पुरस्कार
सुपर मॉम, स्मार्ट किड्स आज
By admin | Published: September 06, 2016 1:01 AM