लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाºया २५३ खाटांच्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागाला पदनिर्मिती आणि पदस्थापनेची प्रतीक्षा आहे. या विभागासाठी १३७९ पदांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव परिपूर्ण करून वैद्यकीय संचालकांकडे सादर करण्यात येणार आहे. छाननी आणि तपासणी करून प्रस्ताव वैद्यकीय संचालकांकडे सादर करण्यासाठी नोडल अधिकारी आणि अतिरिक्त नोडल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. या विभागाच्या कामाच्या प्रगतीबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय आढावा समिती स्थापन करण्यात आली आहे. या विभागाच्या पाच मजली इमारतीचे काम वेगात सुरू असून डिसेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. इमारतीचे काम पूर्ण होताच विभाग रुग्णसेवेत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु येथील पदभरतीअभावी इमारत पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसेवेला ‘खो’ बसण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पदनिर्मिती आणि पदस्थापना करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न घाटी प्रशासनाक डून सुरू आहे.या विभागाच्या इमारतीचे काम अखेरच्या टप्प्यात असून सध्या रंगरंगोटीचे काम सुरू आहे. विद्युतीकरणाचेही काम लवकरच पूर्ण होईल. यापूर्वी प्राध्यापकांपासून तर चतुर्थ श्रेणीपर्यंतच्या एकूण ४२६ पदांसंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आला. आता १३७९ पदांचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती घाटीच्या सूत्रांनी दिली.
‘सुपर स्पेशालिटी’ला प्रतीक्षा मनुष्यबळाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:43 AM