शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मराठा आरक्षणाला पाठिंबा; पण ओबीसीत वाटेकरी होऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 1:19 PM

Maratha Reservation, OBC Reservation ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्यामुळे यापुढे राज्यात समता परिषदेतर्फे मोर्चे काढण्यात येणार नाहीत

ठळक मुद्देशहरातील फुले दाम्पत्याच्या पुतळ्याजवळ मोठी सभा‘जय ज्योती, जय क्रांती’चा नारा घुमला

औरंगाबाद : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभर सुरू करण्यात आलेले मोर्चे आता थांबविण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओबीसींच्या आरक्षणाला तसूभरही धक्का लागू देणार नाही, असे आश्वासन दिल्यामुळे आजचा औरंगाबाद येथील मोर्चा आभार मोर्चात रूपांतरित करण्यात आला व तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न जाता गुलमंडीवर विसर्जित करण्यात आला. आम्ही मराठा समाजासोबतच आहोत. मात्र, मराठा समाजाने ओबीसी आरक्षणामध्ये वाटेकरी होऊ नये, असे आवाहन माजी खासदार समीर भुजबळ यांनी यावेळी केले.

समीर भुजबळ यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. सकाळपासूनच औरंगपुरा येथील फुले दाम्पत्याच्या पुतळ्याजवळ जिल्हाभरातून येणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली होती. तेथे राजाभाऊ शिरसाठ व नागसेन सावदेकर संचाची क्रांतिगीते कानावर पडत होती. बाजूलाच सभेसाठी उभारण्यात आलेल्या विचारपीठावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ओबीसी नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे अर्धपुतळे ठेवण्यात आले होते. विचारपीठासमोर शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत खलील शेख, महात्मा फुले यांच्या वेशभूषेत विकास पडवळ, सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत मनीषा जाधव व साक्षी चोटमल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत कुणाल खरात सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्यासोबत कार्यकर्ते फोटो काढून घेण्यात समाधान मानत होते.

दुपारी पाऊणच्या सुमारास समीर भुजबळ यांचे औरंगपुरा येथे आगमन झाले. फुले दाम्पत्याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत; परंतु ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये व ओबीसींची जनगणना तात्काळ व्हावी या मागण्यांसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे-पवार यांनी आता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू न देण्याचे स्पष्ट आश्वासन दिल्यामुळे यापुढे राज्यात समता परिषदेतर्फे मोर्चे काढण्यात येणार नाहीत, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.सभेत बापूसाहेब भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, समता परिषदेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक यांची भाषणे झाली. समता परिषदेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी प्रास्ताविक केले. संतोष वीरकर यांनी आभार मानले.

मोर्चाच्या अग्रभागी मंठा येथील बंजारा कलापथकाचे गायक नरेंद्र राठोड, रंजना राठोड आदी दहा ते पंधरा महिला बंजारा नृत्य करीत चालत होत्या. पाठोपाठ सीमा नायक नेतृत्वाखालील नाथपंथी गोसावी समाजाचा समूह पारंपरिक वेशभूषेत चालत होता. अनेक वासुदेव पारंपरिक वेशभूषेत आले होते. गजानन सोनवणे या कार्यकर्त्याने अंगावर छगन भुजबळ यांचा फोटो काढून घेतला होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. ढोल-ताशाच्या गजरात वातावरण चैतन्यमय बनून गेले होते. ‘मी ओबीसी’च्या टोप्या डोक्यावर झळकत होत्या. हातातील तिरंगा झेंड्यावर ‘अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद’ अशी अक्षरे कोरलेली होती. ‘जय ज्योती-जय क्रांती’चा गजर चालू होता. मोर्चा गुलमंडीवर येऊन शांततेत विसर्जित झाला.

पैठणचे नगराध्यक्ष सूरज लोळगे, निशांत पवार, संदीप घोडके, अशोकसिंग शेवगण, मिर्झा कय्युम नदवी, बाबासाहेब पवार, रामभाऊ पेरकर, शशिकला खोबरे, अनिता देवतकर, सुभद्रा जाधव, सरस्वती हरकळ, सरोज नवपुते, नलिनी गिरमे, अनिता गायकवाड, अरुणा तिडके, हेमा घोडके, रंजना गायके, उज्ज्वला सोनवणे, मुक्ता हेकडे, मंदा घोडके, लता डाके, रामदास मैद, बाबासाहेब पुंड, महेश सत्रे, संजय तांबे, संजय आढाव, अभिमन्यू उबाळे, पैठणचे अनिल जाधव, देवीदास सोनवणे, अमोल तुपे आदींचा या मोर्चात सहभाग राहिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणAurangabadऔरंगाबादSameer Bhujbalसमीर भुजबळ