औरंगाबाद : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध होत आहे. मनपातील विरोधी पक्ष असलेल्या ‘एमआयएम’ने शिवसेना-भाजपच्या विरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत आता फक्त औपचारिकता बाकी आहे. बुधवारी युतीचे उमेदवार मोहन मेघावाले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. गुरुवारी पिठासीन अधिकारी त्यांच्या निवडीची घोषणा करतील.१९८८ पासून आजपर्यंत स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बिनविरोध झाली नाही. महापालिकेत प्रथमच विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या ‘एमआयएम’ने शिवसेना-भाजप युतीसाठी सोयीचे राजकारण सुरू केले आहे. यापूर्वीही मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणण्यात आला. ठरावाच्या वेळी मतदान घेण्याची वेळ आल्यावर एमआयएमने युतीसोबत जाणे पसंत केले होते. एमआयएमच्या युती धार्जिण्या राजकारणावर मुस्लिम समाजातून प्रचंड टीकेची झोड उठविण्यात आली होती. ज्या मुस्लिम मतांच्या बळावर एमआयएमने तब्बल २६ नगरसेवक निवडून आणले; आता त्यांच्या भावनांना पायदळी तुडविण्याचे काम एमआयएमकडून सुरू आहे.शिवसेना-भाजप युतीने उमेदवारी अर्ज घेतला. बुधवारी सकाळी खा. चंद्रकांत खैरे, महापौर त्र्यंबक तुपे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, माजी आ. प्रदीप जैस्वाल, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ आदी नेत्यांच्या उपस्थितीत मोहन मेघावाले यांचा अर्ज दाखल करण्यात आला. दिवसभरात सभापतीपदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने मेघावाले यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करणार आहेत.बहुमत हेच एकमेव कारणएमआयएमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले की, स्थायी समितीमधील १६ पैकी ४ च सदस्य आमचे आहेत. बहुमत नसल्याने आम्ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला.
‘एमआयएम’च्या पाठिंब्याने सेनेचे मेघावाले बिनविरोध
By admin | Published: June 02, 2016 1:05 AM