शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पाठिंब्यावरून ‘एमआयएम’मध्ये फूट!

By admin | Published: January 03, 2017 11:11 PM

बीड : नगराध्यक्षपदाच्या लढतीत निकराची झुंज देऊन द्वितीय स्थानी राहिलेल्या एमआयएममध्ये आता पाठिंब्यावरुन धुसफूस सुरू झाली आहे.

बीड : नगराध्यक्षपदाच्या लढतीत निकराची झुंज देऊन द्वितीय स्थानी राहिलेल्या एमआयएममध्ये आता पाठिंब्यावरुन धुसफूस सुरू झाली आहे. ९ पैकी ७ नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याने ठिणगी पडली आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद मिटविण्याचे पक्षापुढे आव्हान आहे. नगराध्यक्ष पदासाठी अटीतटीची लढत दिल्यानंतर बक्षीस म्हणून पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची माळ शेख निजाम यांच्या गळ्यात घातली. निजाम यांना उमेदवारी मिळवून देण्यात सुरुवातीपासून आग्रही भूमिका घेणारे शहराध्यक्ष डॉ. इद्रीस हाश्मी व शेख निजाम यांच्यात आता विरोधी बाकात स्वतंत्रपणे बसायचे की, काकू-नाना आघाडीला पाठिंबा द्यायचा यावरुन दरी वाढू लागली आहे. डॉ. हाश्मी यांनी ७ नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला असून, उर्वरित दोघे शेख निजाम गटाचे म्हणून ओळखले जातात. यामध्ये शेख निजाम यांचे बंधू शेख अमर व अन्य एका नगरसेवकाचा समावेश आहे. काकू-नाना आघाडीकडे सर्वाधिक २० नगरसेवक आहेत. आघाडीचे प्रमुख जि.प. सभापती संदीप क्षीरसागर यांनी उपनगराध्यक्षपद आघाडीकडेच खेचण्यासाठी एमआयएमला सोबत घेण्याची रणनीति आखली आहे. एमआयएमच्या ७ नगरसेवकांचा स्वतंत्र गट आघाडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असून, तशा हालचाली गतिमान आहेत. मात्र एमआयएममध्ये पाठिंब्यावरुन दोन मतप्रवाह पुढे येत आहेत. त्यामुळे येत्या १० जानेवारी रोजी एमआयएमची भूमिका नेमकी काय असेल? याची उत्सुकता वाढली आहे. अंतर्गत कलहाची हाय कमांडने गंभीर दखल घेतली असून, आ. इम्तियाज जलील यांनी बैठकांच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत, मात्र त्या निष्फळ ठरल्या. हैदराबादेतच तोडगा निघू शकतो, असे चित्र आहे. (प्रतिनिधी)