शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

शेतक-यांच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा

By admin | Published: June 01, 2017 3:42 PM

शेतकरी संपाला सत्ताधारी शिवसेनेनं पाठिंबा दर्शवला आहे.

ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 1 - देशाला अन्न धान्य पुरावणारा शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहे. या बळीराजाच्या पाठिशी शिवसेना ठामपणे उभी असून शेतकरी राजाला कर्जमुक्ती मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या लढ्यात शिवसेनासोबत राहील. यासाठी  शिवसैनिक रस्त्यावर उतरत आहेत, असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख विनोद  घोसाळकर यांनी केले .
 
शिवसेनेच्या "मी कर्ज मुक्त होणारच" या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या संकल्पनेतून साकारलेल्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत बोरगाव बाजार येथे बुधवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात  घोसाळकर बोलत होते.
 
यावेळी सहसंपर्क प्रमुख आण्णा साहेब माने , जिल्हा प्रमुख नरेंद्र त्रिवेदी,उपजिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड,व रघुनाथ चव्हान, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अंकुश रंधे,  योगेश पाटील तालुका प्रमुख किशोर अग्रवाल,  दिलीप मचे, गटनेते सुनिल मिरकर, शहर प्रमुख मच्छिद्रंनाथ धाडगे, गजानन चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती .
 
या वेळी बोलताना घोसाळकर म्हणाले की, ""शिवसेना सत्ते असली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ती कायम शेतकऱ्यांसोबत असून शेतकरी कर्जमुक्त झाल्याखेरीज शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही.""
 
(VIDEO : शेतक-यांच्या संपाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड)
राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होत नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून संप सुरू केला आहे. बळीराजाने भाजीपाला व दुधाची विक्री बंद केली असून, शहरे व महानगरांकडे जाणारा शेतमालही सकाळपासून थांबवला जात आहे.  बाजार समित्या व अनेक दूध संकलन केंद्रही संपामध्ये सहभागी झाले आहेत. 
 
मात्र, शेतक-यांच्या या संपाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. आंदोलनाला सुरुवात करत काही ठिकाणी शेतक-यांनी वाहनांची तोडफोड सुरू केली आहे. 
(शेतकऱ्यांचा संप सुरू; दूध-भाजीपाला बंद!)
कशी ठरली संपाची दिशा?
पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी ३ एप्रिलला ग्रामसभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी १ जूनपासून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. ‘किसान क्रांती’ समन्वय समितीने बुधवारी पुणतांब्यात संपाची घोषणा केली. ४०हून अधिक संघटना संपात उतरल्या असल्याचे समन्वय समितीचे धनंजय जाधव, धनंजय धोरडे, जयाजीराव सूर्यवंशी यांनी सांगितले. शरद जोशी व रघुनाथ पाटील प्रणीत शेतकरी संघटना, खा. राजू शेट्टी यांची स्वाभिमानी व संजीव भोर यांची ‘शिवप्रहार’ संघटना संपात उतरल्या आहेत.  
 
बाजार समित्यांच्या फेडरेशनचे अध्यक्ष माजी आ. दिलीप मोहिते यांनीही बाजार समित्यांच्या वतीने संपाला पाठिंबा जाहीर केला. नेवासा बाजार समितीने बंद जाहीर केला आहे. पुण्यात डॉ. बाबा आढाव यांनी हमाल मापाडी संघटनेचा पाठिंबा जाहीर केला आहे. नगर जिल्ह्याच्या फर्टिलायझर असोसिएशननेही कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
 
मुंबई, नवी मुंबईचे धान्य कोठार म्हणून मुंबई बाजार समितीची देशभर ओळख आहे. रोज दोन ते अडीच हजार वाहनांमधून कृषीमाल येतो. यामध्ये भाजी मार्केटमध्ये ४०० ते ५०० ट्रक, फळ मार्केटमध्ये २५० ते ३०० ट्रक, कांदा मार्केटमध्ये २०० ते ३५० वाहनांमधून माल येतो.
 
उर्वरित आवक धान्य व मसाला मार्केटमध्ये होत असते. शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या व्यवहारांवर फारसा परिणाम होणार नाही, असे बाजार समितीचे सचिव शिवाजी पहिनकर यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून माल येथे विक्रीसाठी येत असतो. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा थेट परिणाम येथील व्यवसायावर होणार नाही.
 
भाजी व फळ मार्केटमधील आवकही सुरळीत राहील, असे ते म्हणाले. फळ मार्केटचे व्यापारी संजय पानसरे यांनीही संपाचा परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. सद्यस्थितीमध्ये चिक्कू, सीताफळ, काही प्रमाणात आंबे वगळता इतर सर्व फळे परराज्यातून येत आहेत. यामुळे मार्केट सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
 
भाजी मार्केटमध्ये गुजरात व इतर ठिकाणांवरून भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत आहे. गुरुवारी सर्वच व्यापाऱ्यांनी माल मागविला आहे. सातारा, सांगली परिसरात आंदोलनामुळे माल येण्यास विरोध झाल्यास थोडाफार परिणाम होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
 
शिवसेनेचा पाठिंबा
उद्धव ठाकरे यांनी समन्वय समितीच्या नेत्यांना मुंबईला बोलविले होते. त्यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप, खा. सदाशिव लोखंडे यांनी पुणतांब्यात येऊन पाठिंबा जाहीर केला.
 
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शेतमालाला हमीभाव व कर्जमुक्तीसाठी आंदोलन केले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणला होता. ११ आॅक्टोबरला बैठक घेणार होते. मात्र सरकार फसवे असल्याचे सिद्ध झाले आहे.