औरंगाबाद : कॉंग्रेसने काळातील राफेल करारातून त्यांनी रिकामा ग्लास घेतला होता आता आम्ही भरलेला घेतला आहे. या खरेदीच्या अहवाल कॅग समोर सादर केला असून यात कसलाही घोटाळा नाही. यामुळे विरोधकांनी चर्चेसाठी लोकसभेत यावे असे आव्हान केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर यांनी दिले.
राफेल खरेदीवर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजप आणि कॉंग्रेस यांनी एकमेकावर हल्लाबोल सुरु केला आहे. आज केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहिर हे शहरात आले असता त्यांनी या विषयावर पत्रकाराशी बोलताना यात कुठलाही घोटाळा नसल्याचे स्पष्ट केल. या खरेदीच्या अहवाल कॅग समोर सादर केला आहे. यामुळे विरोधकांनी हिम्मत असेल तर लोकसभेत चर्चेसाठी यावे असे आव्हान त्यांनी दिले. तसेच 2006 पासून आजवर विमान खरेदीत कमीशन मिळत नसल्यामुळे युपीए सरकारने हा करार रोखल्याचे आरोपही त्यांनी यावेळी केला.
सुधारणा केल्याने फरक नाही सर्वोच्च न्यायालयाने सरकारला क्लीन चीट दिल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच प्रतिज्ञापत्रात सुधारणा केल्याने काहीही फरक पडणार नाही. सुप्रीम कोर्टाने सर्व उत्तरे दिली आहेत. कॉंग्रेसने गैरसमज पसरविल्याबद्दल देशाची माफी मागावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली.