औरंगाबाद : शस्त्रक्रिया म्हटली की काही वर्षांपूर्वी अनेकांकडून सरळ नकार दिला जात असे. शस्त्रक्रिया एक आव्हानच ठरत होते. तासन्तास शस्त्रक्रियेत जात असे; परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील वेदना, धोका, वेळ आणि काही अंशी खर्चही कमी झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर काही तासांनंतर रुग्ण घरी जातो. रुग्णांचे आयुष्य वाढविण्यात तंत्रज्ञानाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मेसिकॉन-२०१९ परिषदेनिमित्त शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मेसिकॉन संयोजन समिती, औरंगाबाद सर्जिकल सोसायटी आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित मेसिकॉन-२०१९ या शस्त्रक्रिया तज्ज्ञांच्या परिषदेला गुरुवारी ‘एमजीएम’चे सचिव अंकुशराव कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, द असोसिएशन आॅफ सर्जिकल आॅफ इंडियाचे अध्यक्ष (एएसआय) डॉ. अरविंदकुमार, नियोजित अध्यक्ष डॉ. पी. रघुराम, डॉ.उमेश भालेराव, डॉ. रॉय पाटणकर, आयोजन सचिव डॉ. राजेंद्र शिंदे, आयोजन अध्यक्ष डॉ. मिलिंद देशपांडे, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर मुसांडे, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विकास देशमुख, डॉ. सतीश धारप, संयोजन प्रमुख डॉ. पुरुषोत्तम दरख यांची उपस्थिती होती.३ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या परिषदेत पहिल्या दिवशी विविध विषयांवर १२ तज्ज्ञांचे मार्गदर्शन, एक पॅनल चर्चा झाली. यावेळी वैज्ञानिक समिती अध्यक्ष डॉ. नुसरत फारुकी, डॉ. नारायण सानप, डॉ. अनिता कंडी, डॉ. अनंत बीडकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. मोहंमद अन्सारी, डॉ. सुरेश हरबडे आदी उपस्थित होते.कामकाजासाठी लवकर सक्षमडॉ. पी. रघुराम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, तंत्रज्ञानामुळे अनेक शस्त्रक्रियांचा खर्च कमी झाला आहे. लॅप्रोस्कोपीसह अनेक आधुनिक शस्त्रक्रियांचा रुग्णांना मोठा फायदा होत आहे. शस्त्रक्रियांना लागणारा वेळ कमी झाला आहे. रुग्ण लवकर बरा होतो आणि कामकाज करण्यासाठी लवकर सक्षम होतो, हे सगळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे.भारतात संशोधनाची आवश्यकताशस्त्रक्रि येसाठी वापरण्यात येणारी अनेक यंत्रे परदेशातील आहेत. त्यामुळे काही शस्त्रक्रियांचा खर्च अधिक आहे. त्यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी भारतातही यंत्रे निर्मितीची गरज आहे. त्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे, असे डॉ. प्रवीण सूर्यवंशी म्हणाले.जगातील एकमेव सर्जिकल रोबो परिषदेतजगातील एकमेव अमेरिकेचा सर्जिकल रोबो ‘दाविंची रोबो’ परिषदेत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हाताने शक्य न होणाºया शस्त्रक्रिया या रोबोमुळे सहज होतात. या रोबोमुळेच अशक्य असलेल्या शस्त्रक्रिया शक्य होऊन रुग्णांना नवीन आयुष्य मिळत आहे. वाढत्या संशोधनाने त्याचा दर आगामी कालावधीत नक्कीच कमी होण्यास मदत होईल. औरंगाबादेत हा रोबो पहिल्यांदा दाखल झाला. याद्वारे लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करणे सोपी झाली. वैद्यकीय क्षेत्रासाठी आधुनिक तंत्रज्ञान वरदान ठरत असल्याचेही डॉ. सूर्यवंशी म्हणाले.प्रत्येक गाठ कर्करोगाची नसतेपरिषदेत बोलताना स्तनातील प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसते. त्यामुळे घाबरून जाता कामा नये, असे पी. रघुराम म्हणाले. शस्त्रक्रियेचे कौशल्य आत्मसात करण्याबरोबर डॉक्टरांनी संवाद कौशल्य, मानसिक कौशल्य, जमाव नियंत्रण आदी गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे, असे डॉ. उमेश भालेराव म्हणाले.डॉक्टर, इंजिनिअर, बायोटेक्नॉलॉजीस्ट एकत्रडॉक्टर, इंजिनिअर आणि बायोटेक्नॉलॉजीस्ट यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यातून आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान होईल. रुग्णांच्या दृष्टीने संशोधन झाले पाहिजे, असे परिषदेच्या शुभारंभप्रसंगी अंकु शराव कदम म्हणाले.
शस्त्रक्रियेतील वेदना, वेळ, खर्च, आधुनिक तंत्रज्ञानाने झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:59 PM
शस्त्रक्रिया म्हटली की काही वर्षांपूर्वी अनेकांकडून सरळ नकार दिला जात असे. शस्त्रक्रिया एक आव्हानच ठरत होते. तासन्तास शस्त्रक्रियेत जात असे; परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियेतील वेदना, धोका, वेळ आणि काही अंशी खर्चही कमी झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर काही तासांनंतर रुग्ण घरी जातो. रुग्णांचे आयुष्य वाढविण्यात तंत्रज्ञानाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मेसिकॉन-२०१९ परिषदेनिमित्त शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ठळक मुद्देमेसिकॉन-२०१९ : शस्त्रक्रिया तज्ज्ञांनी उलगडले उपचारातील नव्या तंत्रज्ञानाचे योगदान