औरंगाबाद : लाखो रुपये मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांची यादी महापालिकेने चौकाचौकात लावून गांधीगिरी सुरू केली आहे. या यादीत काँग्रेसचे आ. सुभाष झांबड यांचे नाव टाकून त्यांच्याकडे ३ लाख ४८ हजार ५६७ रुपये थकबाकी असल्याचे दाखविण्यात आले. वास्तविक पाहता झांबड यांच्याकडे एक रुपयाचीही थकबाकी नव्हती. कर विभागातील जुन्या फायली न पाहता आ. झांबड यांची बदनामी करणारे दुय्यम आवेक्षक एस. बी. संगेवार, लिपिक मोहंमद अब्बास आबेदी यांना आज रात्री मनपा आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले.जाधवमंडी भागातील झांबड हाईटस् येथे आ. सुभाष माणिकचंद झांबड यांच्या नावाने सदनिका क्र.४०२ होती. या सदनिकेवर ३ लाख ४८ हजार रुपये मालमत्ताकर थकीत असल्याचे मनपा कर्मचाऱ्यांनी दाखविले. वास्तविक पाहता खूप वर्षांपूर्वी झांबड यांनी ही सदनिका विकली होती. थकबाकीदारांच्या यादीत आपले नाव कसे आले, असा प्रश्न त्यांनी मनपा प्रशासनाकडे उपस्थित केला. प्रशासनाने युद्धपातळीवर चौकशी मोहीम सुरू केली. २००९-१० मध्ये महापालिकेने याच मालमत्तेला नव्याने कर लावण्याचा प्रताप केला. २००२-०३ मध्ये याच मालमत्तेला कर लावलेला होता. एकाच मालमत्तेला दोनदा कर लावण्यात आला. यासंदर्भातील प्रकरण दुय्यम आवेक्षक एस. बी. संगेवार, लिपिक मोहंमद अब्बास आबेदी यांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भातील कोणतीही माहिती कर्मचाºयांनी वॉर्ड अधिकाºयांना दिली नाही. आमदाराच्या नावावर कोणतीही थकबाकी नसताना त्यांच्यावर थकबाकी दाखविल्याबद्दल बुधवारी रात्री मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी संगेवार, आबेदी यांना निलंबित केले.
मनपातील दुय्यम आवेक्षकांसह लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:03 AM
लाखो रुपये मालमत्ताकर थकविलेल्या नागरिकांची यादी महापालिकेने चौकाचौकात लावून गांधीगिरी सुरू केली आहे. या यादीत काँग्रेसचे आ. सुभाष झांबड यांचे नाव टाकून त्यांच्याकडे ३ लाख ४८ हजार ५६७ रुपये थकबाकी असल्याचे दाखविण्यात आले. वास्तविक पाहता झांबड यांच्याकडे एक रुपयाचीही थकबाकी नव्हती. कर विभागातील जुन्या फायली न पाहता आ. झांबड यांची बदनामी करणारे दुय्यम आवेक्षक एस. बी. संगेवार, लिपिक मोहंमद अब्बास आबेदी यांना आज रात्री मनपा आयुक्तांनी तडकाफडकी निलंबित केले.
ठळक मुद्देवसुलीत अक्षम्य हलगर्जीपणा : आमदाराचे नाव थकबाकीदारांच्या यादीत