शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

चार स्वस्त धान्य दुकानाचे परवाने निलंबित

By admin | Published: July 06, 2017 5:57 PM

राज्य दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत बंद आढळुन आलेल्या पाथरी शहरातील चार स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करुन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले.

ऑनलाइन लोकमत 
 
परभणी : राज्य दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत बंद आढळुन आलेल्या पाथरी शहरातील चार स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकार पत्र रद्द करुन त्यांचे परवाने निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिले. यासोबतच तहसीलदारांच्या मार्फत स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे.
 
पाथरी शहरातील स्वस्त धान्य दुकाना बाबत काही नागरिकांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग मंत्रालयाकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेवुन 1 जुलै 2017 रोजी राज्य दक्षता पथकातिल उपनियंत्रक शिधा वाटप तथा सदस्य राज्य दक्षता समिती चे अधिकारी , पाथरीत दाखल झाले होते.  पथकात जिल्हा पुरवठा निरीक्षक विवेक पाटील, पुरवठा निरिक्षक एम.एम.देशपांडे, एन. एस. चव्हाण, व्ही. पी. नागरगोजे यांचा समावेश होता. पथकाने केलेल्या पाहणीत खुलेजा नसरीन जोडणी महमद खयुम अ.गफुर, शेर खाँ नुर खाँ जोडणी अरुण शामराव कुलकर्णी, अशोक नामदेव सत्वधर, लक्ष्मण पिराजी वांगीकर यांची दुकाने बंद होती. यामुळे यांची अभिलेखे आणि साठा तपासणी करता आली नाही. या चार ही दुकानाला पथकाने सिल ठोकले.
 
अभिलेख व शिल्लक साठा पडताळणी करता न आल्याने याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल महेंद्रकर यांनी जिवन आवश्यक वस्तू कायदा 1955 च्या अनुषंगाने महाराष्ट्र अनुसूचित वस्तुकाड पध्दती द्वारे वाटपाचे नियम आदेश 1988 व अटीचा भंग निष्पन्न झाल्याने चारही दुकानाचे परवाने निलंबित केले. 
 
तहसीलदार यांच्या कडून स्वतंत्र चौकशी
निलंबित करण्यात आलेल्या चारही स्वस्त धान्य दुकानदारांची तहसीलदार मार्फत स्वतंत्र चौकशी केली जाणार आहे, चौकशी नंतर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.