औरंगाबाद : आगामी लोकसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’सह ‘व्हीव्हीपॅट’ यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेंकदासाठी मतदारांना दिसणार आहे. या यंत्राची प्रात्याक्षिके ग्रामिण तसेच शहरी भागांत करुन त्यासंबंधीची व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीकुमार यांनी आज येथे दिले.
अश्वीनकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयात लोकसभानिवडणूक तयारी संदर्भात आढावा बैठक झाली. या बैठकीस सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, एस.एस. बोरकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्यासह विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थिती होते. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या.
आता ईव्हीएमसह व्हीव्हीपॅटसुद्धा यावेळी अश्वीन कुमार यांनी निवडणूक प्रक्रिया निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कटाक्षाने काम करणे आवश्यक असून आगामी लोकसभा निवडणूक ही ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होणार आहे. आपण कोणाला मतदान केले ते लगेच ‘व्हीव्हीपॅट’ यंत्रावर सात सेंकदासाठी मतदारांना दिसणार आहे. मतदारांना पारदर्शक मतदानाचा अनुभव देणाऱ्या या यंत्रामुळे मतदान प्रक्रियेची विश्वासहार्यता वाढणार आहे. त्यामुळे या यंत्राबाबत व्यापक जनजागृती करावी,असे निर्देश अश्वनीकुमार यांनी दिले.