राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती; बीडच्या कॉंग्रेस जिल्हाध्यक्षांनी उंटावरून साखर वाटली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 07:50 PM2023-08-05T19:50:55+5:302023-08-05T19:52:11+5:30
मिरवणूक काढून ५ क्विंटल साखरेचे वाटप शहरात कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केले
अंबाजोगाई:काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याच्या निर्णयाचे बीड जिल्हा काँग्रेस कमिटीने स्वागत केले. तसेच आज सायंकाळी रॅली काढून जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी उंटावरून ५ क्विंटल साखर वाटत आनंद साजरा केला.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत शहरातील प्रमुख रस्त्यांवरून वाजत गाजत, फटाके फोडून, जोरदार घोषणा देत रॅली काढली. यावेळी शहरवासियांना उंटावरून ५ क्विंटल साखर वाटून जिल्हाध्यक्ष देशमुख आणि कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नवा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिमेंट रोड गुरूवार पेठ ते माता श्री योगेश्वरी देवी मंदिर परिसरात रॅलीचा समारोप झाला. राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत, त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.
या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सोनवणे, हणमंतराव मोरे, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंभुराजे देशमुख, संजय देशमुख, रविबापू सोनवणे, प्रविण देशमुख, अशोक देशमुख, संजय काळे, राहुल मोरे, बाळासाहेब जगताप, शेख मुख्तार , किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, योगेश देशमुख, ऋषिकेश सोमवंशी, विनोद सोमवंशी, प्रविण खोडसे, महेश सोमवंशी, मधुकर गंगणे, आश्रूबा कस्पटे, आजू बागवान, अतुल सोमवंशी, शुभम साबळे, ओंकार घोबाळे, सुंदर देशमुख, महेश देशमुख, मनोज जाधव, चंद्रमणी वाघमारे, गणेश देशमुख, शेख अकबर भाई, किरण उबाळे, बाबुराव शिंदे, समद कुरेशी, विठ्ठल उबाळे, इर्शाद कुरेशी, अभिजीत उबाळे, अमजद कुरेशी, लखन उबाळे, सलमान बागवान, लखन अंजान, सोहेल शेख, ज्योतिराम अंजान, फेरोज शेख, आगु संगम, हमीद शेख, अल्ताफ कुरेशी, अजमेर शेख, राम शेलार, महेश चाटे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
सत्यमेव जयते
सुप्रीम कोर्टानं राहुल गांधी यांना दिलासा मिळणे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी मोठी बातमी आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो हेच सार्थ ठरले.
- राजेसाहेब देशमुख,अध्यक्ष, बीड जिल्हा काँग्रेस कमिटी,