स्वा. वि. दा. सावरकर यांच्या जयंती निमित्त सावरकर प्रेमी मित्र मंडळातर्फे शहरतील आठ चौकात अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
मित्र मंडळाचे अध्यक्ष भाऊ सुरडकर यांनी सकाळी समर्थ नगरातील स्वा. सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर अभिवंदन करण्यात आले.
यावेळी सुभाष कुमावत, प्रमोद सरकटे, किरण सराफ, संजय मांडे, सुधीर नाईक, माणिक रत्नपारखी, प्रशांत पुराणिक, शामराव देशपांडे, सुहास बोडस, जगदीश हरसुलकर, गोपाल कुलकर्णी, राजेश मेहता, साधना सुरडकर, गौरी कुलकर्णी, विजया कुलकर्णी, सृष्टी सराफ यांची उपस्थिती होती.
यानंतर औरंगपुरा येथील परशुराम चौक,
मामा चौक, पदमपुरा, देवानगरी, शहानुरवाडी, हडको टीव्ही सेंटर, गारखेडा परिसर, रामनगर, चिकलठाणा,वाळुज सप्तशृंगी माता मंदिर परिसर येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. सायंकाळी प्रा. स्नेहल पाठक यांचे '' स्वा. सावरकरांचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान '' याविषयावर ऑनलाईन व्याख्यान झाले.
चौकट
आज सात्यकी सावरकर यांचे व्याख्यान
शनिवारी सायंकाळी ५ वाजता सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांचे ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. व्याख्यान ऐकावे, असे आवाहन भाऊ सुरडकर यांनी केले.