नांदेड : स्वयंवर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय संगीत समारोहाचा समारोप गायक पं़ रघुनंदन पणशीकर यांच्या मैफलीने झाला़ यावेळी शांताई कृतज्ञता पुरस्कार साहित्यिक देविदास फुलारी यांना प्रदान करण्यात आला़कार्यक्रमाचे उद्घाटक कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर होते़ तर प्रमुख अतिथी म्हणून आ़ प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आ़ ओमप्रकाश पोकर्णा, माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, चैतन्यबापू देशमुख, संतुकराव हंबर्डे, प्रविण साले, अरूंधती पुरंदरे, पत्रकार शंतनू डोईफोडे, दिपकसिंग ठाकूर यांची उपस्थिती होती़सत्काराला उत्तर देताना देविदास फुलांरी म्हणाले, शांताई या बालपणी आपल्या मुलाच्या ताटातील घास मलाही भरवणारी माझी दुसरी आई होती़ तिच्या नावाचा पुरस्कार ही माझ्यासाठी गौरवाची गौष्ट आहे़ या सत्कार सोहळ्यानंतर पं़ रघुनंदन पणशीकर यांच्या संगीत मैफलीस प्रारंभ झाला़ कवयित्री डॉ़ वृषाली किन्हाळकर यांनी घेतलेल्या पं़ रघुनंदन पणशीकर यांच्या मुलाखतीने पणशीकर यांचा जीवनपट उलगडला़ पणशीकर म्हणाले, पंडिता कै़ किशोरी आमोणकर यांच्याकडे संगीत शिक्षणाची सुरूवात झाली़ आमचे गुरू - शिष्य नव्हे तर स्वरांचा ओलावा शिकवणाºया माय- लेकराचे नाते होते़माझ्यावर त्यांनी घेतलेल्या खडतर मेहनतीमुळेच आज मी आपल्या समोर उभा आहे़ किशोरीताई यांच्या आई मोगुबाई कुर्डीकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ ही मिळाल्याचे त्यांनी सांगितले़पंडितजींनी यमन रागातील बडा ख्याल एक तासभर रंगवत सभागृहात रसिकांना स्वरधारांनी चिंब भिजवले़ पद्मनाभा नारायणा या अभंगाच्या भक्तीरस प्रधान स्वरांनी व लय तालाच्या जुगलबंदीने रंगत आणली़ शब्द सुरांच्या या अवीट अशा मैफलीचा समारोप त्यांना गुरूंनी शिकवलेल्या अवघा रंग एक झाला या भैरवीने केला़ नांदेडचे युवा कलावंत प्रशांत गाजरे यांनी तबल्यावर व संवादिनीवर स्वरूप देशपांडे यांनी साथ दिली़ यशस्वीतेसाठी पुरूषोत्तम नेरलकर, ह़ भ़ प़ शरद महाराज नेरलकर, मालती खडकीकर, प्रा़ सुनील नेरलकर आदींनी परिश्रम घेतले़
स्वरधारांनी रंगला शांताई पुरस्कार सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:05 AM