शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

अविश्वासाची तलवार म्यान

By admin | Published: November 18, 2014 12:58 AM

औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे.

औरंगाबाद : मनपा आयुक्त पी.एम. महाजन यांच्या विरोधात अविश्वास आणण्यासाठी उपसण्यात आलेली सत्ताधारी, विरोधकांची तलवार म्यान झाली आहे. आयुक्तांनी लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील धनादेश लिहिण्याचे अधिकार काढून ते मुख्य लेखाधिकारी अशोक थोरात यांच्याकडे दिले आहेत. यासोबतच महावीर पाटणी यांच्याकडे प्रशासकीय अधिकारीपदाचा पदभार देण्यात आला आहे. तसेच अय्युबखान यांच्याकडे आस्थापना अधिकारी-१ या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत लेखाधिकारी संजय पवार यांच्याकडील पदभार काढण्याचे आदेश महापौरांनी दिले. १३ नोव्हेंबर रोजी विरोधी पक्षनेत्यांच्या दालनात पवारांच्या चहापानावरून सेटलमेंटची चर्चा रंगली. १४ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत महापौर, विरोधी पक्षनेत्यांमध्ये पवार यांच्यात पदभार काढण्यावरून बाचाबाची झाली होती. तसेच माजी आ. जैस्वाल यांनी आयुक्तांना लेखाधिकारी पवार यांचा पदभार काढण्यासाठी पत्र दिले होते. १५ नोव्हेंबर रोजी आयुक्तांसोबत सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत विकासकामांच्या संचिका, लेखा विभागातील पदावनतीवरून चर्चा झाली होती. तारेवरची कसरत : बजेटआले ५० टक्क्यांवर मनपाला आगामी काळात तारेवरची कसरत करून खर्च भागवावा लागणार आहे. मनपाला सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न ४०० कोटींच्या आसपास जाणार आहे. यंदाचे बजेट ८०० कोटींचे आहे. शासनाकडून १०० कोटींचे अनुदान मिळाले, तर परिस्थिती सुधारेल; अन्यथा नाही, असा दावा सूत्रांनी केला. २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुका असल्यामुळे या सभेचे हे अंतिम बजेट ठरणार आहे. शिल्लक कामांमुळे आर्थिक नियोजनाची घडी विस्कटली आहे. ४५ कोटींचे रस्ते, ४६४ कोटींची भुयारी गटार योजना, समांतरसाठी दरमहा साडेपाच कोटी रुपये, पथदिव्यांसाठी मनपाला प्राधान्यक्रम देऊन खर्च करावा लागणार आहे. याव्यतिरिक्त २०१२-१३ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटींच्या शिल्लक कामांचा निपटारा अजून झालेला नाही. त्यातच २०१३-१४ च्या अर्थसंकल्पातील १०० कोटी रुपयांची कामे शिल्लक आहेत. २०१४ या वर्षात लोकसभा, विधानसभा, मराठवाडा पदवीधर मतदारसंघ या निवडणूक झाल्या. ५ महिने निवडणूक आचारसंहितेत गेले. ७ महिने पालिका पदाधिकाऱ्यांना विकासकामांसाठी होते. त्यातून साडेचार महिने संपले आहेत. एप्रिल २०१५ मध्ये मनपा निवडणुका आहेत. त्यामुळे पदाधिकारी, नगरसेवकांचा कामे होत नसल्यामुळे तिळपापड होतो आहे.