नांदेड: मनपाच्या कैलासनगर प्रभागातील प्रभाग ९ अ पोटनिवडणूक लढविणाऱ्या अंतिम सात उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी जाहीर केली असून उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले़१४ जून रोजी निवडणूक चिन्ह वाटप तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी तसेच मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात आली़ उमेदवारांचा मतपत्रिकेवरील क्रम, पक्ष व चिन्हांचे नाव पुढीलप्रमाणे- अब्दुल रज्जाक अब्दुल वहाब, अपक्ष (पतंग), आगाशे अनुप श्रीराम, अपक्ष (कपबशी), खेडकर प्रमोद मुरलीधर, शिवसेना (धनुष्यबाण), शेख अफसर शेख बाबू, राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ), मंगला महादेवराव निमकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (हात), शेख अस्लम ऊर्फ मुन्नाभाई खोकेवाला, अपक्ष (दूरदर्शन), वाजीद जहागीरदार, इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी़)़ नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ही जागा राखीव आहे़ उमेदवारांना त्यांचा निवडणूक खर्च दररोज निवडणूक कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे़ संबंधित प्रभागात आदर्श आचारसंहिता लागू असल्याने निवडणुकीशी संबंधित कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रचारकामासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे परवानगी घेणे आवश्यक आहे़ येत्या २९ जून रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रभागातील १६ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार असून मतदान केंद्र आणि अंतिम मतदारांची यादी निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय, मनपा नोटीस बोर्ड व मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे़ ३० जून रोजी मतमोजणी होणार आहे़ (प्रतिनिधी)पोटनिवडणुकीत प्रथमच नोटा बटननुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अस्तित्वात आलेले नोटा ( वरीलपैकी एकही नाही) हे बटन महापालिका पोटनिवडणुकीत प्रथमच मतदान यंत्रात समाविष्ट केले जाणार आहे़ सर्व उमेदवारांच्या शेवटी आठव्या क्रमांकावर हे बटन असेल़ निवडणूक लढविणाऱ्या सात पैकी एकही उमेदवार पसंत नसेल, अशा मतदारांना नोटा बटनाचा वापर करून आपल्या मतदानाचा हक्क नोंदवता येणार आहे़
उमेदवारांना चिन्ह वाटप
By admin | Published: June 16, 2014 12:22 AM