छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात कानाचे आजार बळावण्याची शक्यता असते. कारण, कानात पाणी जाऊन ओलावा राहून बुरशीजन्य संसर्ग होतो. त्यातून कानदुखी, कमी ऐकू येणे असा त्रास होतो. त्यामुळे कानात पाणी जाणार नाही, याची काळजी घेऊन कानाचे आरोग्य जपावे, असा सल्ला कान-नाक-घसा तज्ज्ञांनी दिला.
ओलाव्यामुळे कानाला धोकाकानात पाणी गेल्याने ओलावा निर्माण होतो. या ओलाव्यातून कानात बुरशीजन्य संसर्गाला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात याचे प्रमाण काहीसे वाढते, असे कान-नाक-घसा तज्ज्ञांनी सांगितले.
पावसाळ्यात काय काळजी घ्याल?पावसाळ्यात कानात पाणी जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. पावसात भिजल्यानंतर, स्नानानंतर, पोहून आल्यानंतर कान त्वरित कोरडे करावेत. कानात कापूस लावलेली काडी टाकू नये. मधुमेह असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी.
कानाच्या इन्फेक्शनची लक्षणे काय?कान दुखणे, खाज येणे, कानातून काळसर, पिवळसर पाणी वाहणे ही बुरशीजन्य संसर्गाची काही लक्षणे आहेत. यामुळे कानात तीव्र वेदना होणे, ऐकू येण्यास अडचण येणे, असा त्रास होतो.
घरगुती उपाय नकोपावसाळ्यात कानात बुरशी होण्याचे प्रमाण काहीसे वाढते. कानाच्या आजारावर घरगुती उपाय करणे टाळावे. त्यातून कानाचे आजार वाढू शकतात. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे.- डाॅ. सुनील देशमुख, कान-नाक-घसा विभागप्रमुख, घाटी