शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
5
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
8
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
9
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
10
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
11
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
12
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
13
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
14
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
15
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
16
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
17
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
18
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
19
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

तरुणांनो आरोग्य सांभाळा; तपासणी केली अन् झाले आजाराचे निदान, काहींवर सर्जरीचीही वेळ

By संतोष हिरेमठ | Published: November 01, 2023 7:07 PM

राज्यात आरोग्य विभागांतर्गत आयुष्मान भव: मोहिमेंतर्गत झाली तपासणी; कुणाला उच्चरक्तदाब, कुणाला मधुमेह, हर्निया, पोटाचे विकार

छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात जाईपर्यंत अनेक तरुणांना आपल्याला काही आजार असेल, याची कल्पनाही नव्हती. मात्र, मोफत तपासणी केली आणि काहींना उच्चरक्तदाब, तर काहींना मधुमेह तर काहींना इतर आजारांचे निदान. ‘आयुष्यमान भव’ अभियानात १८ वर्षांवरील तरुणांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे. यातून ही बाब पुढे आली आहे.

राज्यात आरोग्य विभागांतर्गत आयुष्मान भव: मोहिमेंतर्गत १७ सप्टेंबरपासून ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे- वैभव महाराष्ट्राचे’ अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १८ वर्षांखाली ३७ हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली. यात तब्बल १५ हजार जणांवर औषधोपचार करण्यात आले, तर काहींवर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरसह हिंगोली, जालना, परभणी जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती आहे. आरोग्य उपसंचालक डाॅ. भूषणकुमार रामटेके म्हणाले, हे अभियान ३१ डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रापासून, तर जिल्हा रुग्णालयांपर्यंत सर्व ठिकाणी तपासणी केली जात आहे.

या तपासण्या आणि उपचारआरोग्य विभागांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये १८ वर्षांवरील तरुणांची रक्तदाब, मधुमेह, हर्निया, पोटाचे विकार, एचआयव्ही, तोंडाचा कर्करोग, मनोविकारासह इ. तपासण्या केल्या जात आहेत. ज्यांना शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, अशांना शासकीय रुग्णालयासह शासकीय योजना लागू असलेल्या खाजगी रुग्णालयात संदर्भित केले जाते. एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आतापर्यंत ५०१ जणांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले.

चार जिल्ह्यांतील तपासणीची स्थितीजिल्हा- तपासणी झालेले १८ वर्षांवरील पुरुष- वैद्यकीय चाचण्या- औषधोपचार- शस्त्रक्रियाछत्रपती संभाजीनगर- ३७,००३--३०,०६७--१५,०२०--५०१हिंगोली-२७,५१५--२४,६२१--३,६८०--८८जालना-२०,८९८--१७,८१८--८,२४३--७३परभणी-४३,४४६--३६,९१२--७,५२५--५०

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबाद