औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर बुधवारी सकाळी इंडिगोच्या विमानसेवेचे ‘टेकआॅफ ’ झाले. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी मुंबईहून इंडिगोचे विमान दाखल झाले. त्यानंतर १८० प्रवाशांना घेऊन या विमानाने औरंगाबादहून मुंबईसाठी उड्डाण घेतले.
मुंबईहून आलेल्या इंडिगोच्या पहिल्या विमानाला विमानतळावर वॉटर सॅल्युट देण्यात आला. पहिल्या विमानातून आलेल्या प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक सुनीत कोठारी, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फोरमचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे, सीएमआयएचे अध्यक्ष गिरीधर संगानेरिया, इंडिगोचे स्टेशन मॅनेजर अविनाश पाटील आदींची उपस्थिती होती. या विमानाचे पायलट कीर्ती राऊत यांचेही यावेळी स्वागत करण्यात आले.