छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिकांच्या त्यांच्या प्रकल्पांची ‘रेरा’मध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच आता प्लॉट, फ्लॅट विकणाऱ्या एजंटांनाही ‘रेरा’चे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे तुम्ही प्लॉट, फ्लॅट एजंटच्या मध्यस्थीमधून घेत असाल तर सर्वप्रथम त्या एजंटकडे ‘रेरा’ प्रमाणपत्र आहे का, हे तपासा.
जिल्ह्यात २०० एजंटांकडे प्रमाणपत्रबांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्पातील फ्लॅट, रो हाऊस विक्री करण्यासाठी एजंटची महत्त्वाची भूमिका असते. आतापर्यंत या एजंटांची नोंद होत नसे, शहरात अनेक एजंट निर्माण झाले आहेत. पानटपरीचालकही एजंट बनले आहेत. मात्र, ज्याने ‘रेरा’ चे नोंदणीकृत प्रमाणपत्र घेतले, तोच अधिकृत एजंट मानला जात आहे. शहरात सुमारे २०० एजंटांनी ‘रेरा’चे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.
प्रमाणपत्रासाठी परीक्षा आवश्यकबांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प विकतात, त्यांनाच ‘रेरा’चे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या एजंटला आधी २० तासांचे (दररोज २ तास, म्हणजे १० दिवस) प्रशिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी दोन ते तीन संस्था कार्यरत आहेत. त्यांचे १५०० ते ५ हजार रुपये असे शुल्क आहे. प्रशिक्षणानंतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना ‘रेरा’ रजिस्ट्रेशनसाठी चलन भरावे लागते. ११ हजार ते ११५०० रुपयांपर्यंत चलन असते. हे वैयक्तिक एजंटसाठी व ती जर मार्केटिंग कंपनी असेल तर एक लाखापर्यंत चलन भरावे लागते. त्यानंतर एजंटला ‘रेरा’चे प्रमाणपत्र मिळते.- उदय कासलीवाल, संयोजक, ‘रेरा’ समिती, छत्रपती संभाजीनगर
सहा महिन्यांनंतर विक्रीची द्यावे लागते माहितीजसे बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पांची अद्ययावत माहिती दर सहा महिन्यांनी ‘रेरा’च्या वेबसाईटवर द्यावी लागते. तसेच आता एजंटलाही त्याने कोणत्या बांधकाम व्यावसायिकांची प्रॉपर्टी कोणाला विकली, याची माहितीसह महिन्यांनी ‘रेरा’च्या वेबसाईटवर द्यावी लागणार आहे.
बांधकाम व्यवसायात एजंटचे ट्रेंड नाहीमुंबई, पुणे येथे बांधकाम व्यवसायात एजंट आहेत. त्याप्रमाणे नामांकित बांधकाम व्यावसायिकांची प्रॉपर्टी विक्री करणाऱ्यामध्ये एजंटांची संख्या कमी आहे. कारण येथे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात थेट ग्राहक जातात. बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात व्यवहार होतो. यामुळे मध्यस्थी (एजंट) ची आवश्यकता कमी पडते, असे बांधकाम व्यावसायिकांनी सांगितले.