शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

तलाठी परीक्षेच्या घोटाळ्याचा मास्टर माईंड नऊ महिन्यांनी जेरबंद

By सुमित डोळे | Updated: June 20, 2024 18:52 IST

मिल कॉर्नर परिसरात फिरतानाच ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांचा मास्टरमाईंड दत्ता कडूबा नलावडे (२७, रा. भालगाव) हा तब्बल नऊ महिन्यांनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी सकाळी मिलकॉर्नर परिसरात निवांत फिरताना आढळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सप्टेंबरमध्ये शहरात तलाठी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले. तेव्हापासून दत्ता पोलिसांना गुंगारा देत होता.

५ सप्टेंबर रोजी चिकलठाण्यातील आयऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर राजू भीमराव नागरे (२९, रा. कातराबाद) याला पोलिसांनी रंगेहाथ उत्तरे पुरवताना पकडले. त्यानंतर यात टीसीएस कंपनीच्याच कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा घोटाळा होत असल्याचे तत्कालीन उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या तपासात निष्पन्न झाले होते. यात पर्यवेक्षक शाहरुख युनूस शेख (२७, रा. भायगाव, वैजापूर), पवन सुरेश सिरसाट (२६, रा. ब्रिजवाडी), सफाई कर्मचारी बाली रमेश हिवराळे व विकी रोहिदास सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. दत्ता पसार झाला होता.

रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला दत्ता कायद्याचा विद्यार्थी आहे. मात्र, तरीही तो या रॅकेटचा मास्टरमाईंड आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना शाहरुख, पवनसोबत त्याची मैत्री झाली. दत्ताने खुबीने दोघांना केंद्रावर पर्यवेक्षकाची नोकरी लावली होती. परीक्षेच्या आदल्या दिवशी दत्ता, विकी बालीकडे मोबाइल दिला जात होता. राज्यातील कुठल्याही सेंटरवरून पेपर फोडून तो नागरेला पाठवला जायचा. नागरे इतरांकडून त्याची उत्तरे मिळवून बालीच्या मोबाइलवर पाठवायचा. बाली चेजिंग रूममध्ये जाऊन एका कागदावर उत्तरे लिहून शाहरुख, पवनच्या माध्यमातून परीक्षार्थीपर्यंत उत्तरे पुरवत असे.

आधीचे अनेक गुन्हेशनिवारी एमआयडीसी सिडकोचे अंमलदार प्रकाश सोनवणे, विनोद कानपुरे मिल कॉर्नर भागात असताना त्यांना काही अंतरावर दत्ता दिसला. त्यांनी तत्काळ त्याचा पाठलाग करून मुसक्या आवळून उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांना ही बाब कळवली. घुगे, अर्जुन राऊत, अंमलदार संतोष गायकवाड, अरविंद पुरी यांनी येऊन दत्ताला ठाण्यात नेले. यापूर्वी दत्तावर २०१८, २०१७ मध्ये परीक्षा घोटाळ्यांचे गुन्हे दाखल असल्याचे घुगे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद