भोकर : शेतीच्या पेर्याचे उतार्यामध्ये हळदीच्या पिकाची नोंद घेण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना तलाठी संजय आसोले हे अॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले़ भोकर तालुक्यातील थेरबन सज्जामध्ये कार्यरत असलेले तलाठी संजय आसोले यांनी एका शेतकर्याकडून शेतीच्या पेर्याचे उतार्यात हळदीची नोंद करण्यासाठी २ हजारांची लाच मागितली़ यात तडजोड होवून शेवटी एक हजार घेण्याचे ठरले़ सदरील शेतकर्यास बँकेकडून पीककर्ज घ्यायचे होते़ याबाबत शेतकर्याने अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालयात तक्रार नोंदवली़ या तक्रारीवरून २८ मे रोजी दुपारी ४़१५ वाजता सापळा रचला व तहसील कार्यालयाच्या जवळील एका हॉटेलात एक हजार रुपयाची लाच घेताना तलाठी संजय आसोले यास अटक करण्यात आली़ यावेळी पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, पोहेकॉ अर्जुनसिंह ठाकूर, पो़ना़ दत्तात्रेय वडजे, साजीद अली, मारोती केसगीर, चालक शेख अनवर यांची सापळा रचताना प्रमुख उपस्थिती होती़ याबाबत रात्री उशिरापर्यंत भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू होती़ (वार्ताहर)
एक हजाराची लाच घेताना तलाठी अडकला
By admin | Published: May 29, 2014 12:38 AM