शहरं
Join us  
Trending Stories
1
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
2
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
3
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
5
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
6
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
7
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
8
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयोवृद्ध बॅटर
9
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
10
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
11
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
12
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
13
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 
14
Rohit Sharma Records, IND vs NZ 1st Test: रोहित शर्माचे फक्त ५ षटकार अन् बनणार भारताचा 'सिक्सर किंग'; या दिग्गजाचा विक्रम धोक्यात
15
Nanded Lok Sabha Bypoll 2024 Date: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा; निकाल कधी?     
16
आचारसंहिता म्हणजे काय? नियम आणि कधीपासून लागू होते? जाणून घ्या सविस्तर...
17
निवडणूक घोषित होताच अजित पवारांना धक्का; माजी आमदारानं साथ सोडली, महायुतीला फटका
18
100 KM वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या आपत्कालीन खिडकीतून चिमुकली बाहेर उडून पडली; पुढे...
19
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून खास रणनीती, या नेत्यांकडे सोपवली विभागनिहाय जबाबदारी 
20
“विधानसभेलाही मराठवाड्यात मनोज जरांगेंचा इफेक्ट दिसेल, मविआ उमेदवार जिंकतील”: बजरंग सोनावणे

तलाठ्यांना सुटेना सज्जा; बदलीचे आदेश निघूनही प्रशासनाच्या आदेशाला ठेंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 8:01 PM

तलाठ्यांच्या बाबत प्रशासन एवढा वेळकाढूपणा का घेत आहे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट महिन्यात तलाठ्यांच्या बदल्यांमध्ये संशय कल्लाेळाच्या चर्चेने जिल्हा प्रशासन ढवळून निघाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली तलाठ्यांची आस्थापना देण्याच्या शासन निर्णयाला हरताळ फासत बंदल्यांमध्ये ‘लिलाव’ झाल्याची चर्चा अजूनही सुरूच आहे. असे असताना दोन महिन्यांपासून काही तलाठ्यांनी प्रशासनाच्या बदल्यांच्या आदेशाला ठेंगा दाखविला आहे. बदलीचे आदेश निघूनही अनेकांनी सध्या सज्जा सोडलेला नाही. परिणामी, ज्यांची बदली झाली ते दुसरीकडे रुजू झाले, तर ज्यांना मर्जीतील ठिकाण मिळाले नाही, म्हणून ते आहे त्याच ठिकाणी आहेत. यात सामान्य नागरिकांची होरपळ होत आहे.

जिल्ह्यातील तलाठी बदल्यांमधील गैरप्रकार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांना समुपदेशन अभिलेख तपासण्याचे आदेश दिले. त्याचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

तलाठ्यांच्या बदल्यानंतर महसूल सहायक आणि अव्वल कारकून यांच्याही बदल्या झाल्या. त्यातीलही अनेकांनी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास चालढकल केल्यानंतर प्रशासनाने एकतर्फी कार्यमुक्तीचे आदेश काढले. मग तलाठ्यांच्या बाबत प्रशासन एवढा वेळकाढूपणा का घेत आहे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान बदल्या केलेल्यांपैकी १०१ तलाठी रुजू झाल्याचा दावा प्रशासन करीत आहे.

प्रशासकीय बाजू अशीमहसूल सहायक, अव्वल कारकुनांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यातील अनेक जण रुजू झाले नाहीत, हे कळाल्यानंतर त्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे आदेश ४ ऑक्टोबर रोजी काढले. त्यांना आता बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावेच लागेल. अन्यथा ते सध्या जिथे कार्यरत आहेत, त्या आस्थापनेवरून त्यांचे वेतन निघणार नाही. असाच निर्णय तलाठ्यांच्या बाबतीत माहिती घेऊन होईल.-विनोद खिरोळकर, निवासी उपजिल्हाधिकारी

बदली करण्यात आलेले तलाठी - १११महसूल सहायक : ५१अव्वल कारकून : २४मंडळ अधिकारी : ७

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRevenue Departmentमहसूल विभाग