लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपल्यापैकी अनेकांमध्ये काही सुप्त कलागुण असतात; पण अनेकदा या कलागुणांना वाव मिळत नाही. कधी आर्थिक कारणामुळे, कधी कौटुंबिक कारणामुळे तर कधी मंच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाही. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच आघाडीवर असतो. लोकमत आणि कलर्स वाहिनी आयोजित ‘सूर रायझिंग स्टार्स’चे या कार्यक्रमातून आज दि. २० जानेवारी रोजी प्रतिभावंत गायकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.दु. ४ वा. लोकमत भवन येथे होणारी ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी खुली आहे. प्रवेश मागील गेटने देण्यात येईल. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध, कौटुंबिक, संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासोबतच सामाजिक बांधिलकीचेही अनेक उपक्रम कलर्स वाहिनीतर्फे राबविले जातात.‘रायझिंग स्टार’च्या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे भारतातील पहिल्या लाईव्ह रिअॅलिटी शोचे दुसरे पर्व. भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटी मोडून एक प्रतिभावंत जगासमोर आणण्याचा प्रयत्न या स्पर्धेतून केला जाणार आहे. या शोच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपºयातून लाईव्ह व्होटिंग करू शकता. संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दलजित दोसांज हे संगीत क्षेत्रातील दिग्गजही या कार्यक्रमात गायकांना मार्गदर्शन करतील व परीक्षण करतील; परंतु खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. कलर्स वाहिनीवर दि. २० जानेवारीपासून दर शनिवार-रविवारी रात्री ९ वा. सुरू होत आहे देशातील एकमेव लाईव्ह सिंगिंग रिअॅलिटी शो ‘रायझिंग स्टार’.
‘सूर रायझिंग स्टार’ मध्ये गाणार प्रतिभावंत गायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 11:56 PM
आपल्यापैकी अनेकांमध्ये काही सुप्त कलागुण असतात; पण अनेकदा या कलागुणांना वाव मिळत नाही. कधी आर्थिक कारणामुळे, कधी कौटुंबिक कारणामुळे तर कधी मंच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाही. हीच बाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच आघाडीवर असतो. लोकमत आणि कलर्स वाहिनी आयोजित ‘सूर रायझिंग स्टार्स’चे या कार्यक्रमातून आज दि. २० जानेवारी रोजी प्रतिभावंत गायकांना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये आज लोकमत भवन येथे आयोजन : कलर्स-लोकमत समूह उपक्रम