प्रदीर्घ कालावधीनंतर आता शाळा सुरू होत आहेत. पुढची पिढी घडणे महत्त्वाचे आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे, ही चांगली गोष्ट आहे; पण त्रिसूत्रीचा वापर करून कोरोना पळवून लावणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझिंग याचा विसर पडता कामा नये. काही अतिउत्साही मंडळींनी येणारे सण घरातच साजरे करावेत, त्याचे सार्वत्रिकीकरण करू नये.
- डॉ. बाळासाहेब पवार, अध्यक्ष, शिवा ट्रस्ट, औरंगाबाद.
...................................................
शिक्षण संस्थांचं नुकसान झालंय
प्रदीर्घ काळापासून शाळा बंद राहिल्या. ऑनलाईन क्लासेस विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलेल्या नाहीत. यात शिक्षण संस्थांचं व विद्यार्थ्यांचंही खूप नुकसान झालंय. आता कोरोना स्वीकारला पाहिजे. थोडाफार तो वाढणार हे गृहीत धरलं पाहिजे. तो वाढला म्हणून पुन्हा शाळा बंद करण्याचा खेळ व्हायला नको. शाळा सुरू होत आहेत, याचा आनंद आहे.
- राम भोगले, अध्यक्ष, स. भु. शिक्षण संस्था, औरंगाबाद.