शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

टँकर गॅस गळती; शहर पूर्ववत होण्यासाठी का लागले १४ तास, घटना सर्व यंत्रणांसाठी केसस्टडी 

By विकास राऊत | Published: February 02, 2024 12:14 PM

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: गॅस स्फोटक असल्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सावधगिरीने पावले उचलली जात होती.

छत्रपती संभाजीनगर : सिडकोतील उड्डाणपुलालगतच्या दुभाजकाला टँकर धडकल्यामुळे लागलेल्या गॅस गळतीने शहरातील मुख्य जीवनवाहिनी असलेला जालना रोड तब्बल १४ तास जाम केला. तांत्रिक माहितीचा अभाव, प्रभारी जिल्हाधिकारी आणि एचपीसीएलकडे बचावकार्यासाठी नसलेल्या यंत्रणेमुळे शहर पूर्ववत होण्यासाठी १४ तासांचा वेळ गेला. घटना शहरात घडल्यामुळे महापालिकेलाच फ्रंटवर यावे लागले. पोलिसांनी बंदोबस्त चोखपणे लावला, तर जिल्हा प्रशासनाने १४४ नुसार जमावबंदीचे आदेश जारी केले.

शहरात अशी घटना पहिल्यांदाच घडली. त्यामुळे सकाळपासून बचावकार्य सुरू झाले, परंतु सगळी प्रशासकीय यंत्रणाच नेमके काय करावे, या विवंचनेत होती. गॅस स्फोटक असल्यामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी सावधगिरीने पावले उचलली जात होती. पालिका प्रशासक जी. श्रीकांत, प्रभारी जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, पोलिस आयुक्त मनोज लोहीया, अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांच्यात चर्चा झाल्यानंतर बचावकार्याला वेग मिळाला. एचपीसीएलचे प्रकल्प व्यवस्थापक प्रईस जेम्स यांनी वाहतूक कंत्राटदाराकडे बोट दाखविले. त्यांनी तांत्रिक विषयावर, त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनासाठी काय साधन सामग्री आहे, याबाबत काहीही माहिती दिली नाही. दरम्यान, प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, शहरात अशी घटना होण्याचा व बचाव कार्याचा पहिला अनुभव होता. उपायुक्त नितीन बगाटे यांनीदेखील अशीच प्रतिक्रिया नोंदविली.

एनडीआरएफचे स्वतंत्र युनिट हवे....अपघाताची सकाळी ९ वाजता एनडीआरएफ टीमला माहिती देण्यात आली. पुण्यातील फाईव्ह एनडीआरएफचे निरीक्षक चंद्रकेतू शर्मा, योगेश शर्मा यांच्यासह २५ जवान दुपारी ३ वाजता शहरात दाखल झाले. मात्र, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली होती. मराठवाड्यासाठी एनडीआरएफच्या स्वतंत्र युनिटची गरज यानिमित्ताने जाणवली.

घटना सर्वांसाठी केसस्टडी...शहरात पहिल्यांदाच अशी घटना घडली. गॅसगळती पाहण्यासाठी कुणीही समोर जाण्यास तयार नव्हते. तज्ज्ञ व सुविधांचा अभाव जाणवला. अशा घटनांना योग्य प्रकारे सामोरे जाण्यासाठी एनडीआरएफच्या टीमसह तांत्रिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. त्यासाठी ही घटना सर्वांसाठी केसस्टडी असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

चार तास तर काही कळालेच नाही...अपघात झाल्यानंतर सकाळी नऊ वाजेपर्यंत यंत्रणेला घटनेचे गांभीर्यच कळाले नाही. एचपीसीएलच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा गॅस गळतीमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले, तेव्हा सगळी प्रशासकीय यंत्रणा वेगाने अलर्ट होऊन रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले.

तीन वॉर्डांत कलम १४४ लागू केले...एच.पी. कंपनीच्या गॅस टँकरला अपघात होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. तो गॅस हवेमध्ये पसरण्यास सुरुवात झाली. या अपघातस्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात रहिवासी वस्ती, शाळा, कॉलेज, हॉटेल, दुकाने आणि सुमारे ४० हजारांच्या आसपास नागरी वास्तव्य आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सिडको एन-३, एन-४, एन-५ परिसरातील सर्व शाळा व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निवासी उपजिल्हा दंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जारी केले. सकाळपासून ते गॅस गळतीची घटना पूर्णत: नियंत्रणात येईपर्यंत हे आदेश लागू होते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात