विठ्ठल भिसे,पाथरीमहात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेंतर्गत पात्र ठरलेल्या पाथरी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींना शासनाकडून अद्यापही बक्षीस वाटप करण्यात आलेले नाही़ या गावांची तपासणी झाल्यानंतर पुरस्काराची निवड झाली़ गावकऱ्यांमध्ये आनंदोत्सवही साजरा करण्यात आला़ परंतु, प्रशासनाच्या उदासिन भुमिकेमुळे आता गावकऱ्यांमध्ये नाराजी उमटू लागली आहे़ राज्य शासनाने २००८ साली राज्यामध्ये महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविण्यास सुरुवात केली़ गावातील तंटे गावातच मिटले पाहिजे, जुने तंटे तडजोडीतून सोडविता आले पाहजे आणि इतर विविध निषक देऊन महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम राबविण्यासाठी शासनस्तरावरून मोठी जनजागृती करण्यात आली़सुरुवातीच्या काही वर्षात या मोहिमेंतर्गत गावांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला़ प्रत्यक्षात या योजनेमधील निकषही पूर्ण केले़ गावातील तंटे गावातच मिटू लागल्याने नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर वाढू लागला़ कालांतराने या योजनेला राजकीय स्वरुप येऊ लागले़ तंटामुक्त समित्यांच्या अध्यक्ष निवडीसाठी ग्रामसभेमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या़ तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद मिळाले की, आपण गावाचा न्याय निवाडा करू असा समजही झाला़ परंतु, कालांतराने या मोहिमेमध्ये गाव पातळीवर नागरिकांचा सहभाग कमी होत गेला़ असे असले तरी या मोहिमेंतर्गत दरवर्षी तालुका आणि जिल्हास्तरावर समित्यांची तपासणीही केली जाते़काही इच्छुक ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होऊन योजनेचे निकषही पूर्ण करतात़ परंतु, शासनाकडून या योजनेसाठी निवड झालेल्या गावांना विसर पडला असल्याचे दिसून येत आहे़ पाथरी तालुक्यात २०१२-१३ या वर्षात तंटामुक्त अभियानामध्ये बक्षीसासाठी सहा गावांची निवड झाली़ यात लोणी बु़, वाघाळा, लिंबा, गौंडगाव, पाथरगव्हाण खुर्द आणि कानसूर या गावांचा समावेश आहे़ शासनाकडून या गावांना अद्यापही बक्षीस देण्यात आले नाही किंवा गावाचा सन्मानही करण्यात आला नाही़ आजही येथील ग्रामस्थ बक्षीसाच्या रक्कमेसाठी आणि सन्मानासाठी आतूर झाले आहेत़ समित्यांचा उत्साहात मावळलागावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी शासनाने ही योजना राबविली़ पण, संबंधित गावांना योग्यवेळी योग्य सन्मान व बक्षीस देण्यात येत नसल्यामुळे तंटामुक्त समित्यांच्या उत्साहावर विरजण पडत आहे़ यामुळे शासनाने बक्षीसासाठी पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना गौरव करून प्रोत्साहन द्यावे, अशी प्रतिक्रिया लोणी बु़चे सरपंच रवींंद्र धर्मे यांनी दिली़
तंटामुक्त गावे बक्षिसांच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 18, 2014 1:07 AM