दुर्लक्ष : आष्टीत महावितरणचे अधिकारी सुस्तनितीन कांबळे ल्ल कडापावसाळ्याच्या तोंडावर वादळ -वाऱ्यामुळे विद्युत तारा पडून मोठ्या प्रमाणात घटना घडतात. शनिवारी रात्री बीड तालुक्यातील करचुंडी येथे ३३ केव्हीची विद्युत तार पडून २१ जनावरे दगावली. इतर तालुक्यात देखील विद्युत तारा जिर्ण झाल्याने धोका कायम आहे. एकट्या आष्टी तालुक्यात वर्षभरात विद्युत तार तुटून नुकसानीच्या पन्नास घटना घडल्या आहेत.तारा तुटण्याच्या घटना घडूनही महावितरणचे अधिकारी सुस्त असल्याचे दिसत आहे. शाळा, महाविद्यालय परिसर तसेच शेतकऱ्यांच्या कडब्याच्या गंजी तारा तुटल्याने जळून खाक झालेल्या आहेत. सुदैवाने मनुष्यहानी झालेली नाही. परंतु महावितरणकडून दुरुस्तीस विलंब लागत असल्याने घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.या गावांमध्ये घडल्यात घटनाकडा, घाटापिंपरी, देवळाली, लोखडवाडी, खरकटवाडी, धामणगाव, पिंपळा, वाहिरा, दौलावडगाव, डोईठाण, नागतळा, सावरगाव, शिराळ, पिंपरी घुमरी, धिर्डी, हनुमंतगाव चिखली, वेलतुरी, तागडखेल, खिळद, लिंबोडी, उंदरखेल, सुलेमान देवळा, साबलखेड, पुडीवाहिरा, घोंगडेवाडी, खुंटेफळ, म्हसोबावाडी यासह अनेक गावांत, तर धामणगाव येथे इंदिरा कन्या शाळेच्या आवारात विद्युत तारा तुटण्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत; पण सुदैवाने मनुष्यहानी टळली होती. या उपरही महावितरणने धडा घेतला नाही.प्रस्ताव पाठविला : दुरुस्तीसाठी हवेत १० कोटीतालुक्यातील लघु व उच्च दाबाच्या तारा झिजल्याने मोठ्या प्रमाणावर तुटण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळाच्या तोंडावर महिन्यांपूर्वी वरिष्ठाकडे तार, खांब, डीपी, इतर विद्युत साहित्य यासाठी तालुक्यातील सर्व ठिकाणी सर्व्हे सुरू असून, दहा कोटी रुपये निधी उपलब्ध व्हावा, यासाठी वरिष्ठाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे महावितरणचे अभियंता मदन देशपांडे यांनी सांगितले.
वर्षभरात तुटल्या ५० ठिकाणी तारा
By admin | Published: May 11, 2016 12:10 AM