शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लातूर शहरात रमाई घरकुल योजनेत ३०० घरांचे उद्दिष्ट, साडेसात कोटींची आवश्यकता

By हणमंत गायकवाड | Published: March 11, 2024 3:59 PM

ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा व्यक्तींसाठी रमाई घरकुल योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविली जाते.

लातूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजना लातूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येते. आतापर्यंत या योजनेंतर्गत ४ हजार १९५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी २७०२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर सद्य:स्थितीत ८३५ गुरुकुलांचे बांधकाम चालू आहे. दरम्यान, चालू आर्थिक वर्षासाठी ३०० घराचे उद्दिष्ट असून त्यासाठी सात कोटी पन्नास लाख रुपयांची आवश्यकता भासणार आहे.

ज्यांना घर नाही किंवा ज्यांचे घर कच्चे आहे, अशा व्यक्तींसाठी रमाई घरकुल योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी राबविली जाते. लातूर महापालिकेमार्फत आतापर्यंत या योजनेत चार हजारांच्या वर घरकुलांना मंजुरी मिळाली असून जवळपास तीन हजारांपर्यंत घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याचा ताबाही संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला असून आणखीन गरजू लाभार्थ्यांना घरकुले देण्यात येणार आहेत. त्यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी ३०० घरांचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, बांधकामासाठी सात कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी लागेल, अशी अपेक्षा लातूर मनपाच्या वार्षिक अंदाजपत्रकात व्यक्त करण्यात आलेली आहे.

घरकुल योजनेसाठी या आहेत अटीलाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा, ज्याला घर नसावे, स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. लाभधारकाने ३० चौरस मीटरचे शौचालयासह बांधकाम करणे आवश्यक आहे. उत्पन्नाचे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्र देऊन प्रस्ताव सादर करणे आवश्यक.

घरकुलांसाठी आतापर्यंत ९२ कोटींचा निधीआतापर्यंत रमाई घरकुल योजनेत लातूर शहरातील घरकुलांसाठी लातूर मनपाला ९२ कोटी ७८ लाख ५० हजार रुपये इतका निधी मिळाला आहे. त्यापैकी ७८ कोटी ९७ लाख ४० हजार रुपये इतका निधी खर्च झालेला आहे. २०११ ते २०२३-२४ पर्यंत हा निधी प्राप्त झाला आहे. आता पुढे तीनशे घरकुलांचे उद्दिष्ट असून त्यासाठी शहा- सात कोटींवर निधी लागणार आहे.

एका घरकुलासाठी अडीच लाखांचे अनुदानअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील लावारड्यांसाठी रमाई घरकुल योजना राबविण्यात येते. एका घरकुलासाठी दोन लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत असून तीन ते चार टप्प्यांमध्ये अनुदान संबंधित लाभार्थ्याला देऊन घरकुल तयार करण्यात येत आहेत. त्यानुसार लातूर शहरांमध्ये २७०२ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. सद्य:स्थितीत ८३५ घरकुलांचे बांधकाम चालू आहे.

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिका