जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यात समन्वयक म्हणून काम पाहतील. सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग बाधित व्यक्तीचे व मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोरोनामुळे आई-वडिलांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची, तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्हांना बळी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. फोर्समध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सदस्य म्हणून असतील. कोरोना काळात पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांची कोणालाही माहिती मिळाली तर त्यांनी चाईल्ड लाईन १०९८ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चाईल्ड हेल्प लाईन १०९८ चा माहितीफलक सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी टास्क फोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:04 AM