शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

टाटा कंपनी उभारणार इलेक्ट्रिकल वाहनांसाठी शहरात १० चार्जिंग स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 8:20 PM

10 charging stations in the city for electric vehicles इंधनाचे वाढते दर नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन देत आहे.

ठळक मुद्दे तीन महिने मोफत सेवा दहा ठिकाणी जागेचा शोध सुरू

औरंगाबाद : देशभरातील महानगरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ऐतिहासिक औरंगाबाद शहरातही चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात शहरात १० ठिकाणी स्टेशन उभारण्यासंदर्भात टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत महापालिकेची चर्चा झाल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

इंधनाचे वाढते दर नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. दुसरीकडे पेट्रोल व डिझेलच्या वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहन वापरास प्रोत्साहन देत आहे. यासाठी देशात विविध शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले जात आहे. देशातील किमान प्रमुख २५ शहरांत इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याची तयारी केली जात आहे. राजधानी दिल्लीत प्रत्येक तीन किलोमीटरवर चार्जिंग स्टेशन उभारले जात आहे. महाराष्ट्रात ठाणे शहरात शुक्रवारी ऑटो रिक्षांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाले. या पार्श्‍वभूमीवरच पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्याची पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातही इलेक्ट्रिकल वाहनांसाठी दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे.

दहा ठिकाणी जागेचा शोध सुरूशहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यापासून पहिले तीन महिने शहरवासीयांना मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दहा ठिकाणी हे स्टेशन उभारण्यासाठी जागांची निवडही लवकरच केली जाणार आहे.

टाटा कंपनीने दिली सहमतीशहरात दहा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात नुकतीच टाटा मोटर्स व टाटा पॉवर कंपनीसोबत चर्चा झाली आहे. त्यांनी हा प्रकल्प औरंगाबाद शहरात राबविण्यास सहमती दर्शवली आहे. यासंदर्भात लवकरच संबंधित कंपनी व पालिका यांच्यात सामंजस्य करार होईल.- आस्तिक कुमार पांडेय, प्रशासक, महापालिका. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाelectricityवीज