विद्यार्थी, पालक, शिक्षकांना बनवले तंत्रस्नेही : अडथळ्यांवर मात करुन शोधल्या वेगळ्या वाटा
औरंगाबाद : कोरोनाच्या महामारीपूर्वी खडू-फळाएवढ्या मर्यादित असलेल्या शिक्षणाने महामारीच्या काळात ऑनलाईन शिक्षण विस्तारले. ऑनलाईन शिकावे लागेल, हे स्वप्नातही नव्हते. २० ते ३० टक्के मुलांपर्यंत शिक्षण या माध्यमातून पोहोचले. तरी माहिती संवादाचे तंत्रज्ञान वापराचे ज्ञान मुलांना बालवयातच मिळाले. शिक्षकांनीही ते आत्मसात केले. शिवाय पालकांनाही तंत्रस्नेही बनविले, असे मत शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य सहकार्यवाह एस. पी. जवळकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
एखादी महामारी ३६५ दिवस येईल, त्यात शिकावे लागेल हे कुणाच्याही स्वप्नी नव्हते. त्याचे अनेक दुष्परिमाण झाले असले तरी शिक्षणाच्या दृष्टीने शाळांना, पालकांना, शिक्षकांना बहुआयामी बनविले. पालक मुलांच्या शिक्षणात लक्ष देऊ लागले. स्वाध्याय, अभ्यासास महत्त्व आले. सुरुवातीला स्मार्ट फोनच्या उपलब्धतेच्या, नेटवर्कच्या समस्या होत्या. मात्र, त्यावरही मात करून एक फोन घरात कसा वापरायचा, त्याचे व्यवस्थापन झाले. त्यातून आदानप्रदान करीत सर्वच शिकले. मात्र, गरजेचे तंत्रज्ञान वयोवृद्धांनीही लहानग्यांकडून शिकून घेतले. आता शाळांत शारीरिक, परिसरची स्वच्छता, भविष्यातील संकटासाठीची तयारी करायला शिकविल्याने दुसरी लाट मोठी असताना ती भीती राहिली नाही. आपण कृतिप्रिय शिक्षणाकडे वळलो. हस्तांदोलन टाळून दुरून नमस्कार, आरोग्य विज्ञान शिकलो. वेळेचे व्यवस्थापन त्यात गृहिणींनाही नियोजनात त्यांचे काैशल्य दाखविण्याचे स्थान मिळाले. महामारीने जीवन जगण्याचे सामर्थ्य दिले. आलेल्या परिस्थितीला हाताळणे शिकविले. आता संस्थाचालक म्हणून आकस्मिक निधीचे शाळा आणि शासनाने मिळून नियोजन केले पाहिजे, असे जवळकर यांनी सांगितले.
(अपूर्ण)